वृत्तांकन : श्री दिपक मैंदर्गे, उपसंपादक स्वराज्य न्यूज, महाराष्ट्र
मुंबई (प्रतिनिधी) : समाज संघटित असला तर तो काय करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मदतीचा हात कासारांची साथ हा स्तुत्य उपक्रम. कासार समाजाच्या माध्यमातून चालवला जात आहे. 2018 पासून हा उपक्रम काही समाज बांधवांनी सुरू केलेला आहे. समाजात गोर गरीब व्यक्तींना त्यांच्या उपचारार्थ किंवा त्यांच्यावर आस्मानी संकट, अडचणीच्या काळात त्यांना मदत देण्याच्या दृष्टीने समाज एकत्र येऊन हे कार्य करीत आहे. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य ग्रुपमधील सर्व जबाबदार व्यक्ती कार्य करत असून कोणाची मदत करायची, कोणाला मदतीची गरज आहे त्याची माहिती घेणे वास्तविकता जाणून मदतीची तीव्रता जाणून घेणे हे सर्व एकदम नियोजनबद्ध पद्धतीने केल्या जाते, त्यानंतर पोस्ट तयार करणे, नियमित पोस्ट शेअर करणे त्यामुळे यात योग्य व्यक्तीला मदत पोहोचवल्या जाते. आज कासार समाज हा विखुरलेला समाज असून एवढ्या विखुरलेल्या समाज असूनही मागच्या चार वर्षात 16 लाख रुपये मदत आपल्या सर्वांच्या माध्यमातून करू शकलो हे समाज किती संघटित आहे हे दाखवते. हा उपक्रम असाच सुरू रहावा यातून अजून काही समाजसेवा मोठ्या प्रमाणात घडावी या दृष्टीने समाजबांधव प्रयत्नशील आहेत.
आर्थिक परिस्थितीने खालावलेल्या समाज बांधवाच्या कुटुंबास अडचणीच्या प्रसंगी काहीतरी करीत मदतीच्या रूपाने उपयोगी पडावे, या विचाराने प्रेरित होऊन २०१८ मध्ये काही समाज बांधव ” एक हात मदतीचा “ या व्यासपीठावर/ प्लॅटफॉर्मवर एकत्रित आले. या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील संकटग्रस्त कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीतून सावरण्यासाठी त्यांना साहाय्य करावे असे ठरले. त्यावेळी लावलेलं हे रोपटं या साडेचार वर्षात बघता बघता एका डौलदार वृक्षात रूपांतरीत झाले आहे.
एखाद्या बांधवावर अकस्मात आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आजारपण इ. अडचणीच्या प्रसंगी त्या कुटुंबाचे पाठीशी उभे राहून, त्यातून सावरण्यासाठी ही टीम/चमू/हा समूह समाज बांधवांना ऐच्छिक मदतीचे आवाहन करून, समाजा कडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करते.
सुरवातीस फेब्रुवारी २०१८ ते १२ सप्टेंबर २०२० या अडीच-तीन वर्षाचे कालावधीत एकूण ९ पीडित कुटुंबास आर्थिक साहाय्य मिळवून दिले. मुख्यत्वे करून समाजातील आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या घटकास खालील गंभीर व संकट समयी आर्थिक मदत केली आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
◆ १) एप्रिल २०१८ — श्री रवि शेंडे… शिरपूर जैन, ता मालेगांव जि वाशिम येथील समाजबांधव यांच्या टिनाच्या पत्र्याचे छत असलेल्या घरी गॅस सिलेंडर स्फोट झाला, त्यामुळे घराची पूर्ण वाताहात होऊनही, मदतीच्या आवाहनानुसार दोनच दिवसात जमा झालेल्या समाजाच्या फक्त २२०००/- रुपयाचे मदतीवर समाधानपूर्वक निर्धाराने मदत थांबविण्यास सांगणारी ही एकमेव व्यक्ती आहे…
◆ २) मे २०१८ — कॅन्सर पेशंट… सौ काटकर ताई, घनसावंगी, जि जालना, औषधोपचारास रु ६५,०००/- मदत…
◆ ३) २०१८ च्या पावसाळ्यात जुलै-ऑगस्ट मध्ये श्री काळे कुटुंब, नासिक यांचे राहते घर कोसळले त्या करीता रु ८०,०००/- मदत…
◆ ४) दिनांक २७/२/२०१९ — चि समीर मनोज पांढरकर, अमरावती (वय वर्ष १५) त्याचे १० वी परीक्षे दरम्यान त्याचे आजीने व वडिलांनी बिकट आर्थिकमुळे एकाच वेळी आत्महत्या केल्याने, रु ३८,४००/- मदत…
◆ ५) दिनांक ०८/०५/२०१९ — स्व श्री अनंता विरुळकर, महान ता बार्शीटाकळी, जि अकोला,त्यांच्या पत्नीस आर्थिक रु ३९,११४/- मदत…
◆ ६) ऑगस्ट २०१९ — हैद्राबाद (आंध्रप्रदेश) मधील भिकणूर येथील समाज भगिनी सौ माधुरी नागेश निडारकर यांना डिलिव्हरी दरम्यान प्रकृती चिंताजनक झाल्याने हॉस्पिटल खर्च व औषधोपचार करीता १६०,०००/- मदत…
◆ ७) दिनांक ०८/१०/२०१९ — श्री गणेश अशोकराव अंदुरे, उमापुर अपघातात डोक्याला जबरदस्त मार, हाॅस्पिटल खर्च व औषधोपचार साठी रु ११०,०००/- मदत…
◆ ८) दिनांक १३/११/२०१९ … संगमनेर येथील श्री बाळासाहेब कोळपकर, यांना किडनी ट्रीटमेंट साठी रु ५०,२००/- मदत…
◆ ९) दिनांक ११/०३/२०२० — श्री गिरीश विभूते, परभणी, बाईक अपघातग्रस्त हाॅस्पिटल खर्च व औषधोपचार रु ७७,५१३/- मदत…
◆ १०) दिनांक ०२/०५/२०२० — चरई ता पोलादपूर जि रायगड, येथील कै. गणेश तुळशीराम कासार, घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यु रु ५९,४६८/- मदत…
◆ ११) दिनांक १२/०९/२०२० — श्री रूपेश अशोक कासार, मलकापूर, जि बुलढाणा… पॅरेलेसिस ट्रिटमेंटसाठी रु ३५,०००/- मदत…
◆ १२) दिनांक ३०/०९/२०२० — चिंचोडी, ता निलंगा जि लातूर, येथील सौ उषाताई उमाटे… कॅन्सर पेशंट उपचारार्थ रु ३०५७५/- मदत….
◆ १३) दिनांक २७/१२/२०२० — श्रीमती ज्योती गोपाळ तंगे, सिडको, औरंगाबाद… मांडीच्या हाडाचे ऑपरेशन व औषधोपचाराच्यार्थ रु ३०,८०७/- मदत …
◆ १४) दिनांक २५/०१/२०२१ — सौ वैशाली नितीन उंबरकर, अमरावती, ब्लड कॅन्सर ट्रिटमेंट रु २५,६०८/- मदत उपचार दरम्यान पेशंट दगवल्याने मदत थांबविली…
◆ १५) दिनांक २५/०३/२०२१ — श्री अरविंद पद्मकुमार टोणगे, पिरंगुट ता मुळशी जि पुणे… दोन्ही किडनी औषधोपराच्यार्थ रु ४१,०३४/- मदत…
◆ १६) दिनांक ०५/०६/२०२१ — स्व श्री लक्ष्मण यशवंत कोळपकर,(तळोदा,नंदुरबार) ह मु सिल्वासा, गुजरात. त्यांची पत्नी ला रु १००,७६७/- मदत…
◆ १७) दिनांक ०३/०९/२०२१ — चि चिन्मय अंबादास दहातोंडे, (१० वर्ष) वसमत… हृदयाच्या छिद्रचे ट्रिटमेंट उपचारार्थ आर्थिक रु ४९,५०७/- मदत…
◆ १८) दिनांक १५/०९/२०२१ — श्री प्रविण रामभाऊ हलगे, परभणी, Brain (मेंदू) Neurosurgery करीता रु ११२,३००/- मदत…
◆ १९) दिनांक २९/१०/२०२१ — चि चिन्मय दहातोंडे ओपन हार्ट सर्जरी करीता रु ८२,९२२/- उपचार दरम्यान पेशंट दगवल्याने मदत थांबविली…
◆ २०) दिनांक ०२/०२/२०२२ — श्री स्वप्निल अरुण अंभोरे, बांबोरी जि अहमदनगर, तोंडातील म्युकसचा व दाढेचा कॅन्सर उपचारासाठी रु १७३,४३३/- मदत…
◆ २१) दिनांक १०/०३/२०२२ — श्री अनंता जगदीश मशीतकर, माटरगाव जि बुलढाणा, दोन ही कडनी च्या उपचारार्थ रु ६४,५७५/- मदत…
◆ २२) दिनांक १५/११/२०२२ — चि प्रथमेश जितेंद्र कंदले, अनदूर जि उस्मानाबाद, ४४० व्होल्टेज ईलेक्ट्रिक शॉक, उपचारासाठी रु १५७,९६१/- मदत….
या उपक्रमाच्या माध्यमातून कासार समाजाच्या महाराष्ट्रातील २० कुटुंबास व महाराष्ट्रा बाहेरील आंध्र प्रदेश व गुजरात येथील प्रत्येकी एक-एक अशा एकूण २२ कुटुंबास त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी समाजाने उदार दातृत्वाने आर्थिक मदत करीत हातभार लावला असून आज पर्यंत एकंदरीत *16,06,093/- (सोळा लाख सहा हजार त्र्यांनऊ रुपये फक्त…) इतक्या भरघोस मदतीचे योगदान दिलेले आहे.
मदतीचा हात… कासारांची साथ टीमचे सहयोगी सदस्य.
१)श्री जितेंद्र कुयरे,खामगांव- 94222 00008
२)श्री सुनिल अंदुरे उमापूर – 73502 80182
३)श्री प्रमोद शिंनगारे जालना – 98342 43978
४)श्री राजेंद्र कोळपकर डोंबिवली- 99206 71731
५)श्री शाम पोफळे नाशिक – 80878 89603
६)श्री विशाल पांढरकर खामगांव-94045 09304
७)श्री अलकेश गोरे गोरेगाव – 81084 24191
८)श्री स्वप्नील घडमोडे औ बाद- 94033 27140
९)श्री सुनील शिलवंत जालना – 99230 26038
१०)श्री राहुल रेडगे परभणी- 99709 96531
११)श्री माऊली भांडेकर आळंदी- 98812 15401
१२)श्री दिपक मैंदर्गे अंधेरी मुंबई- 86555 47333
१३)श्री गणेश साळवी रायगड- 70831 28302
आणि
१४)श्री अरुण पांडे नागपूर – 94032 11018
मदतीचा तपशील….
01) शिरपूर मदत 22,000 √
02) घनसावंगी मदत 65,000 √
03) नासिक मदत 80,000 √
04) अमरावती मदत 38400 √
05) महान मदत 39114 √
06) हैद्राबाद मदत 160000 √
07) अंदूरे उमापुर मदत 110000 √
08) संगमनेर मदत 50200 √
09) बाबा शिनगारे 77513 √
10) रायगड मदत 59468 √
11) मलकापूर मदत 35000 √
12) उमाटे मदत 30575 √
13) ज्योती तंगे मदत 30807 √
14) उंबरकर मदत 25608 √
15) टोणगे मदत 41034 √
16) कोळपकर मदत 100767 √
17) दहातोंडे मदत 49507 √
18) परभणी मदत 112300 √
19) चि चिन्मय दहातोंडे 82922 √
20) स्वप्निल अंभोरे 173433 √
21) अनंता मशितकर 64575 √
22) चि प्रथमेश कंदले 157961 √
कासार समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाला स्वराज्य न्यूजच्या शुभेच्छा.