(पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी, दिनांक १५ जानेवारी २०२३)
भगवानबाबा युवा फाउंडेशन आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, दिनांक ०७ जानेवारी २०२३ रोजी बल्लाळेश्वर हाउसिंग सोसायटी, रुपीनगर-तळवडे या ठिकाणी ठिकाणी संपन्न झाला. सकाळी दहा वाजता दिंडी प्रदक्षिणा, राष्ट्रसंत भगवानबाबा, संत वामन भाऊमहाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याने हा सोहळा संपन्न झाला. ऐश्वर्यसंपन्न भगवानबाबा, वसंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ह.भ.प. संतोषमहाराज काळोखे यांचे कीर्तन आणि हरिनाम सप्ताह आरंभ फूल वर्ष भजन दुपारी बारा ते दोन या वेळेत झाले. रविवारी ह.भ.प. पुरुषोत्तममहाराज दादा पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले.

दुपारी एक ते चार या वेळेमध्ये विठ्ठल रुक्मिणी भजनीमंडळ यांनी भजनसेवा प्रदान केली. मंगळवारी ह.भ.प. अद्वैतानंद सरस्वतीमहाराज यांचे कीर्तन आणि जिजामाता भजनीमंडळ यांनी दुपारी एक ते चार वाजेदरम्यान भजनसेवा केली. बुधवारी ह.भ.प. डॉक्टर सुदाममहाराज पानेगावकर यांचे कीर्तन आणि विठाई महिला भजनीमंडळ, यमुना नगर यांनी दुपारी एक ते चार या वेळेत सादरीकरण केले. गुरुवारी ह.भ.प. विशालमहाराज खोले यांचे कीर्तन आणि राधाकृष्ण सेवा भजनीमंडळाने दुपारी एक ते चार या वेळेत भजन केले. शुक्रवारी ह.भ.प. सांधवी सोनालीदीदी करपे या माउलींचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी एक ते चार वाजेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी भजनमंडळाने भजनांचे सादरीकरण केले. शनिवारी ह.भ.प. अक्रूरमहाराज साखरे (गेवराई बीड) यांचे सायंकाळी आठ ते दहा या वेळेत कीर्तन झाले. कानिफनाथ भजनीमंडळ आणि विश्वकर्मा भजनीमंडळ – चिखली यांचे रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत सादरीकरण झाले. रविवार, दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी ह.भ.प. गोविंदमहाराज गोरे, देवाची आळंदी यांचे सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन झाले.
त्यानंतर कै. पद्माकर भीमाशंकर मांडवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चि. नीलेशशेठ पद्माकर मांडवे यांच्यातर्फे दुपारी बारा ते पाच या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड सप्ताहासाठी दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान, मराठवाडा युवा मंच, दक्षता मित्रमंडळ, शिवतेज मित्रमंडळ, एकता मित्रमंडळ, अचानक मित्रमंडळ, क्रांतिज्योत मित्रमंडळ, पी एम पी एल कर्मचारी, पंडित जवाहरलाल नेहरू मित्रमंडळ, गणेश कॉलनी क्रमांक एक मित्रमंडळ, विशेष पोलीस मित्र संघटन, महाराष्ट्र राज्य ईगल मित्रमंडळ, सुदर्शन मित्रमंडळ, हिंदवी स्वराज्य मित्रमंडळ, तिरंगा मित्रमंडळ, गणराज मित्रमंडळ, स्वयंभू युवा मंच, भगवान सेना महाराष्ट्र राज्य, भगवान बाबा मित्रमंडळ-काळेवाडी, संत भगवान बाबा विचारमंच (पिंपरी-चिंचवड) येथील सर्वपक्षीय मान्यवर महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते; तसेच या कार्यक्रमासाठी हरिभाऊ केंद्रे, आधारस्तंभ आबाशेठ नागरगोजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.