हिंदवी स्वराज्य शपथभूमी (श्री क्षेत्र रायरेश्वर) येथे उभारला जाणार हिंदवी स्वराज्य स्तंभ
त्याला अनुसरून
हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन
भोर : प्रतिनिधी – सर्वप्रथम आपल्याला स्वराज्य संकल्पक राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा…!!!

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शु. सप्तमी’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. त्यामुळे या पवित्र-प्रेरणा भूमीला आणि या शपथेच्या प्रसंगाला भारताच्या इतिहासात आणि एकुणातच देशाच्या परंपरेत विशेष आदराचे स्थान आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच या विश्वाच्या प्रेरणा आणि गौरभूमीच्या सन्मानार्थ, तसेच स्वराज्य ते स्वातंत्र्य या प्रवासात-संग्रामात अनेक वीर माता-पुरुष-भगिनी यांनी भरीव योगदान आणि बलिदान दिलं, त्याग केला अश्या अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींच्या गौरवार्थ देखील श्री क्षेत्र रायरेश्वर, तालुका भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य येथे हिंदवी हिंदवी स्वराज्य स्तंभ उभारण्यात येणार आहे.

मागील वर्षी चैत्र शु. सप्तमी (८ एप्रिल २०२२) ३७७ वा हिंदवी स्वराज्य शपथ दिवशी हिंदवी स्वराज्य स्तंभ भूमी पूजन (शिलान्यास) श्री क्षेत्र रायरेश्वर येथे करण्यात आले होते. ह्या सर्व पार्श्वभूमीला अनुसरून हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. आज राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी या स्पर्धेची घोषणा होणे हे हि औचित्याचे आहे आणि हा मोठा शिवयोग आहे. सदर स्पर्धेचे आयोजन आणि संयोजक बायोस्फिअर्स, बी. एन. सी. ए., रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, ग्रामपंचायत रायरी आणि शिवविचारांच्या संस्था- समस्त शिवमावळे यांनी केले आहे.

हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेविषयी थोडक्यात…
स्पर्धेचा विषय: श्री क्षेत्र रायरेश्वर (हिंदवी स्वराज्य शपथभूमी) येथे उभारण्यात येणाऱ्या हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धा
स्पर्धेची सुरुवात: गुरुवार दिनांक १२.१.२०२३
स्पर्धेची सांगता: शुक्रवार दिनांक १०.२.२०२३
स्पर्धेचे नियम व अटी:
- स्तंभ डिझाईन चा आकार (साईझ) हा A0 (841 x 1189 mm) असावा
- रायरेश्वर येथील उपलब्ध जागा हि 40 x 40 फुट आहे
- डिझाईन फाईल हि PDF मध्ये असावी आणि ती स्पर्धेच्या मुदतीच्या आत swarajyastambha@gmail.com ई-मेल वर पाठवावी
- डिझाईन फाईल सोबत 3D ग्राफिक्स, संकल्पना विकसित पद्धती, तांत्रिक गोष्टी आणि त्याची चित्रफित (Walkthrough)
स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कृत देखील केले जाणार आहे. प्रथम पुरस्कार – मानचिन्ह, गौरवपत्र, १०००० रु. राशी; द्वितीय पुरस्कार – मानचिन्ह, गौरवपत्र, ७००० रु. राशी; तृतीय पुरस्कार – मानचिन्ह, गौरवपत्र, ५००० रु. राशी असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तसेच सर्वच सहभागी स्पर्धकांना गौरवपत्र दिले जाणार आहे.
हिंदवी स्वराज्य स्तंभ संकल्पना: स्वराज्य स्तंभ हा हिंदवी स्वराज्य आणि भारतीय स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या, स्वराज्यासाठी रक्त सांडणार्या आणि त्याच्या स्थापनेसाठी अहोरात्र झटणाऱ्या संपूर्ण भारतातील स्वातंत्र्यसैनिकांचे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरा पगड जातीतील त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या त्याग्याचे प्रतिक आहे. स्वराज्यस्तंभ हा अनेक अर्थांनी भारताला आणि विश्वाला प्रेरणा आणि उर्जा देणारा एक स्त्रोत ठरावा या उद्देशाने या अनोख्या स्तंभाची उभारणी देखील केवळ भारताला नव्हे तर संपूर्ण विश्वाला स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या श्री रायरेश्वर शिवलिंग प्रेरणाभूमीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीपूर्ती निमित्त होणे हा देखील मोठा शिवयोग आहे.

आपण सारे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष नुकतेच साजरे केले. आज जी स्वातंत्र्याची मधुरफळे आपण सर्वजण चाखत आहोत याचे बीज हे श्री रायरेश्वर शिवलिंग येथे सन १६४५ चैत्र शु. सप्तमी ला छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरा पगड जातीतील त्यांच्या सहकारी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी घेतलेल्या शपथेत आहे. म्हणून या स्वराज्याच्या उभारणीसाठी प्रेरणा ठरलेल्या भूमीच्या सन्मानासाठी या अनोख्या स्वराज्य स्तंभाची उभारणी करणे औचित्याचे ठरेल.

या स्तंभाच्या उभारणीत, पायाभरणीत मराठ्यांच्या विविध गड-कोट-किल्ले अन् दुर्गांवरून तसेच हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी लढलेल्या युद्धभूमीतून आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभरातील विविध युद्धक्षेत्रे, क्रांतीक्षेत्रे येथील गोळा केलेली पवित्र माती, दगड, पाणी, वापरण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी
मोलाची भूमिका बजावणाऱ्या १२-भिन्न मावळ प्रांत आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्ञात, अज्ञात असलेल्या विविध युद्ध आणि क्रांतीक्षेत्रांचे स्मरणचित्र किंवा उल्लेख, इ. गोष्टींचा समावेश या हिंदवी स्वराज्य स्तंभाच्या उभारणीत केला जाणार आहे. हिंदवी स्वराज्य स्तंभ ही संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची असून सदर स्तंभाच्या उभारणीमुळे निश्चितच आपल्या मावळप्रांताचा, देशाचा स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या दैदिप्यमान त्यागाचा इतिहास संपूर्ण विश्वाला कळेल असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

स्पर्धेचे आयोजन आणि संयोजक: बायोस्फिअर्स, बी. एन. सी. ए., रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, ग्रामपंचायत रायरी आणि शिवविचारांच्या संस्था- समस्त शिवमावळे
हिंदवी स्वराज्य स्तंभ स्पर्धेसाठी संपर्क :
डॉ. सचिन अनिल पुणेकर (९५०३०९६४६९), श्रीमती अस्मिता जोशी (९८८११३४३१३), श्री. दत्तात्रय जंगम (९२२४६३१२०४),
नेहा गायकवाड (९५५२२८३४२५) आणि समस्त शिव-मावळे
ई-मेल: biospheresorg@gmail.com/ swarajyastambha@gmail.com