पिंपरी चिंचवड : तळवडे चिखली येथील हॉटेल मार्तंडाचे उदघाटन भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे तसेच ऑल इंडियन धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष मा.प्रवीण काकडे, युवा अध्यक्ष धनगर महासंघ मा. घनश्याम बापू हाके यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख आकर्षण महाराष्ट्राची लावणी साम्राज्ञी व सिने अभिनेत्री माधुरी पवार यावेळी उपस्थित होत्या. देहू आळंदी रोड शेलार वस्ती चिखली येथे हॉटेल चालू आहे.

तळवडे-निगडी रोड येथील सुप्रसिद्ध ऑस्करवाडी मिसळ हॉटेल च्या भरघोस यशानंतर हॉटेल मार्तंड हे गावकरी व औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य पासून ते उच्चभ्रू लोकांच्या सोयीनी युक्त अशी उत्कृष्ट दर्जाचे जेवण देण्याची ग्वाही हॉटेल मालक उद्योजक श्री गजानन वाघमोडे , गोविंद सातपुते व अक्षय मरगळे यांनी दिली आहे.

विविध हॉटेलच्या स्पर्धेत एक आगळीवेगळी खासियत, आधुनिक व जुन्या परंपरेनुसार भारतीय बैठक, घरगुती पद्धतीनुसार आणि अस्सल गावरानची जत्रेतील चव देण्याचा व सर्वांना आवडेल असं चवीचं दर्जेदार पद्धतीचं मटन भाकरी देण्याचा प्रयत्न आहे. हॉटेलमध्ये सरपंच थाळी, नगरसेवक थाळी, महापौर थाळी,अशी विविधता थाळ्यांचे आयोजन या ठिकाणी आहे, 275 मध्ये सरपंच थाळी अनलिमिटेड हा उपक्रम या हॉटेलमध्ये चालणार आहे.
सर्वांना आवडेल असंच रुचकर आणि चुलीवरचे जेवण याचा स्वाद मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल मार्तंड, जिभेचा नाद आणि चुलीवरचा स्वाद यासाठी हॉटेल मार्तंड हे एक पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नावारूपाला येत आहे.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य नागरिक, उद्योग क्षेत्रातील अनेकजण व स्थानिक विविध राजकीय मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता सिने अभिनेत्री माधुरी पवार यांच्या लावणीने झाली.