मा. शि. प्र. मंडळींच्या माखजन इंग्लिश स्कूल, माखजन जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी शाळेच्या 1998 च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी चा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माखजन इंग्लिश स्कूल, माखजन या शाळेची स्थापना 7 जानेवारी 1917 या दिवशी झाली असून यंदा शाळेला 105 वर्ष पूर्ण झाली आणि 1998 च्या 10 वीच्या समूहाला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने या सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी ” मैत्रीचा रौप्य महोत्सव” आयोजित आयोजित केला होता. शाळेच्या सर्व माजी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे पाद्यपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद साठे ,मुख्याध्यापिका सौ,रूही पाटणकर,इंग्रजी माध्यमाच्या सौ. राजेसावंत आणि सर्व आजी माजी शिक्षक,मा. शि. प्र. मंडळींचे सर्व सभासद,शिक्षकेतर कर्मचारी,सेवक या वेळी उपस्थित होते. श्री. आनंद साठे यांनी माजी विद्यार्थी वर्गाला आश्वासन दिले की 7 जानेवारी हा दिवस इथून पुढे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दिवस म्हणून ठेवेल. त्याचबरोबर शाळेत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. मुख्या. पाटणकर यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच नात पाहून डोळे भरून आले अस प्रतिपादन उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या दरम्यान माजी शिक्षक,कर्मचारी आणि सेवक यांचा माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी श्रीफळ,भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मान केला,तर शाळेला किबोर्ड आणि ड्रम सेट भेट दिला. त्या बरोबर पंचक्रोशीतल्या 5 हुशार मुलांना यावेळी माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी रोख रक्कम मदत म्हणून दिली . या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतल्या माखजन,मावळंगे,कासे ,आरवली ,बुरंबाड याशिवाय पुणे, मुंबई, दापोली, रत्नागिरी, पालशेत, सातारा, महाड,कोल्हापूर,दुबई येथून माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश नाईक यांनी केले तर सूत्र संचालन श्री. पुरुषोत्तम बेलवलकर यांनी केले. श्री. पराग लघाटे यांनी आभार मानले.

गप्पा गोष्टी ,धमाल मस्ती आणि एकमेकांची माहिती घेत हा मेळावा साजरा करण्यात आला. स्नेहभोजन,शाळेची सफर, शाळेचे दिवंगत शिक्षक,कर्मचारी,सेवक आणि सदस्य यांना श्रद्धांजलि अर्पण केली.

वंदे मातरंम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रज्ञा नामजोशी,स्मिता जाधव, वैशाली घाणेकर,सतीश उमासरे,प्रमोद पवार,संतोष गमरे, संदीप धूलप, गिरीश तांबट, अरुण मांडवकर ,परग लघाटे,आदेश घारपुरे आणि पुरुषोत्तम बेलवलकर यांनी केले होते.