श्री दत्त सेवा प्रतिष्ठान रुपीनगर दत्त जयंती सोहळा दर सालाबादप्रमाणे मिती मार्गशीर्ष ८ शके १९४४ बुधवार दि. ३०/११/२०२२ रोजी श्री व सौ गणेश मारुती चौगुले यांच्या हस्ते कलशपूजन व अभिषेक करून सुरुवात करण्यात आली.
तसेच दैनंदिन कार्यक्रम गुरुचरित्र पारायण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला मंडळाचे भजन व सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तनाचा लाभ सर्व भक्तांना घ्यावा असे असे दत्तसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष -शिरीष भाऊ उत्तेकर यांनी माहिती दिली.

आजअखेर कीर्तनकार ह.भ.प चंद्रशेखर वारे महाराज तसेच बाल कीर्तनकार ह.भ.प कविता दिलीप पगार , शिवव्याख्याते राहुल बांदलकर महाराज यांची कीर्तन रुपीसेवा मिळाली. दररोज सायंकाळी ८वा.ह. भ.प (आळंदीकर) महाराज यांची कीर्तनरूपी सेवा होत असते तसेच दि. ८/१२/२०२२ रोजी ह.भ.प भागवताचार्य रामेश्वर महाराज अडकरी अध्यक्ष -विश्व वारकरी सेना पाथरी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या ज्ञानअमृत श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही संयोजकाच्या वतीने नम्र विनंती
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शिवतेज मित्र मंडळ, शिवाई महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व रुपीनगर हाउसिंग सोसायटी मधील सर्व सभासद बंधू-भगिनी यांचे सहकार्य मिळाले. तसेच सामाजिक कार्यकर्ते शमाकांत (दादा) सातपुते, डी.टी.कांबळे( चेअरमन) व सर्व कमिटी सभासद या कार्यक्रमासाठी अहोरात्र सेवा देत आहेत. रुपीनगर मधील सर्व बंधू-भगिनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री गजानन शेठ वाघमोडे यांनी केले आहे ।