पिंपरी / प्रतिनिधी
सामाजिक परिवर्तनाचा मोठा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण करून इतिहास रचला. उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. बाबासाहेब समाजपरिवर्तनाचा लढा उभारत असताना दुसरीकडे कुटुंबाची अखंड जबाबदारी माता रमाई यांनी उचलली. बाबासाहेबांच्या माघारी कुटुंबाचा डोलारा योग्य पद्धतीने सांभाळला. या मधून माता रमाईं यांचे व्यक्तिमत्व कणखर आणि लढाऊ असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
माता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी जनता आघाडीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे,.सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, खलील मकानदार, जुगनू शेख, मोहम्मद शेख, रेखा भालेराव, सुनिता सरकटे, सुनिता यशवंते आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.