मुंबई * राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकतेच राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन पार पडलं.केंद्र सरकारकडून ओबीसीचे हक्क हिसकावण्याच्या विरोधात; तसेच सापत्न वागणूक, जातीय जनगणना, ओबीसी राजकीय आरक्षण, बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांच्यावर आलेले आर्थिक संकट, ओबीसी, व्हीजेएनटी यांच्यासाठी संघर्षाचा लढा उभारणे व मंडल आयोगाची पूर्णपणे अंमलबजावणी करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी करत शरद पवारांनी थेट मोदी सरकारला आव्हान दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, अनेकजण म्हणतात की यांची नक्की लोकसंख्या किती?, इतकी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंका उपस्थित करतात. आजच्या परिषदेत एक ठराव मान्य केला तो म्हणजे, केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा करुनच टाका आणि कळून जाऊ द्या देशाला की नक्की किती लोकसंख्या आहे आणि त्यासंख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथं कुणी फुकट मागत नाही. जो अधिकार आहे न्यायाचा तो अधिकार मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही.
सदर मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, ओबीसीचे राष्ट्रीय नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, सन्माननीय मंत्री ना हसन मुश्रीफ साहेब, ना जितेंद्र आव्हाड साहेब, ना धनंजय मुंडे साहेब, ना दत्ता मामा भरने, ना आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचे मार्गदर्शन लाभले.
घटकातील विविध समाज बांधव, पदाधिकारी यांचेसोबत चर्चासत्र तसेच त्यांना भेडसावऱ्या समस्या आणि वेळेवर येणाऱ्या विषयावर
या महत्त्वपूर्ण बैठकीला ओबीसी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास कासार समाजाचे श्री गोविंद अंधारे, श्री दिपक मैंदर्गे, श्री अशोकराव जवकर, श्री धनेश पाटील श्री राजेश दोडे, श्री राजेंद्र गोसावी, श्री उमाकांत रासने मान्यवरांची उपस्थिती होती.