अखिल भारतीय कासार विचार मंचच्या वतीने रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी अखिल भारतीय समस्त कासार समाज वधु वर परिचय मेळावा पंढरपूर येथे आयोजित केला होता. वधु वर परिचय मेळावा आयोजनासाठी कासार विचार मंचचे सर्व संचालक सर्व पदाधिकारी सर्व आजीव सदस्य पंढरपूर येथील समाज बांधव आणि कर्नाटक मध्य प्रदेश विदर्भ व महाराष्ट्राच्या विविध भागातील कासार समाज बांधव आणि भगिनींनी उत्तम प्रतिसाद दिला. वधु वर परिचय मेळावा 2022 *रेशीम बंध* पुस्तिका मध्ये ज्या जाहिरातदारांनी जाहिरात दिली मेळाव्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांनी अन्नदानासाठी देणगी दिली आणि वारकरी भवन उभारणीसाठी सढळ हाताने देणगी दिली त्याबद्दल आभार मानले. याठिकाणी भव्य सभामंडप, उत्तम बैठक व्यवस्था, सुनियोजित पुस्तक वाटप व्यवस्था, नवीन वधू वर नोंदणी पुस्तक विक्री व्यवस्था, देणगी स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. यासाठी इंदापूर, लातूर, औरंगाबाद, पंढरपूर, नांदेड, नाशिक तसेच महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन, स्टेज व्यवस्था, कालिका देवी फोटो पूजन व दिपप्रज्वलन व उद्घाटन कार्यक्रम वधू वर परिचयाचे सादरीकरण, मान्यवरांचे सत्कार,, उत्कृष्ट वधुवर सादरीकरण, परिक्षण व साडी वाटप आणि बक्षीस यंत्रणा तसेच श्री मैंदर्गे सर व त्यांच्या टीमने ऑनलाईन वधू वर मेळावा सर्व जगामध्ये प्रक्षेपित केला. डॉक्टर विलास हरपळे व व समाज बांधवांचे आरोग्य तपासणी करता आलेली त्यांची मेडिकल ची टीम या सर्वांचे याठिकाणी आभार मानन्यात आले. तसेच उपस्थितांसाठी याठिकाणी उत्तम निवास व्यवस्था, भोजन व नाष्ट्याची व्यवस्था केली होती.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अशोक डोळ सर, श्री सुभाष दगडे सर,श्री भारत शेठ कोकीळ,श्री राजीव कोल्हापुरे सर ,श्री जयप्रकाश दगडे, श्री मैंदर्गी सर, डॉक्टर विलास हरपळे, डॉक्टर श्री रमाकांत दगडे ,श्री सतीश शेटे, श्री देवेंद्र रणभरे, श्री बाळासाहेब मोहोळकर, श्री प्रशांत मांगुळकर ,श्री चंद्रकांत शिरापुरे, श्री रत्नाकर कोळपकर, श्री कालिदास अष्टेकर, श्री संजय डोळ, श्री सचिन तीवाटणे, श्री शिवराज आंदोले ,श्री सुनील रासने, सौ कांचन ताई कंदले, सौ सुप्रिया पाटील श्री अविनाश मांगले, श्री अनिल कंदले, श्री अभिजीत मांगले, सौ वैशाली बागवडे, श्री प्रशांत वेळापुरे, श्री शुभम गाडे ,श्री विकी कोकीळ, श्री संजय कोकीळ श्री रवी काटकर, श्री विनोद कासार सर, श्री भस्मे,श्री सुनील पालकर ,श्री बालाजी कोकीळ, श्री अशोक मुळे सर, श्री महावीर साळवी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले अक्षय ढोके, सौ उज्वला ढोके, श्री डॉक्टर हरपळे व त्यांची मेडिकल टीम व पंढरपूर नगरपालिका चाकण दिंडी कर व ज्ञात-अज्ञात व्यक्ती संस्था यांचे सहकार्य मिळाले.