उस्मानाबाद : काटी.ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद येथे २३ मे रोजी बाजार चौकातील व्यासपीठावर निसर्ग काव्यमंच समुहाचे ३ रे ग्रामिण कवीसंमेलन उत्साहात आनंदात व जल्लोषात संपन्न झाले.
या संमेलानाचे यशस्वी आयोजन संस्थापक पंकज राजेंद्र कासार काटकर यांनी केले.अध्यक्ष स्थानी बालसाहित्यीक बालकवी समाधान शिकेतोड हे होते.कवी संमेलनाचे उदाघटन श्री.निलेश भुजबळ कासार तपास अधिकारी क्राइम ब्रॅच परभणी यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणुन आनंद दादा कंदले तुळजापुर उपस्थित होते.व्यासपीठावर दिंगबर भुजबळ परभणी,मंगेश विभुते मराठवाडा कासार समाज अध्यक्ष, परभणी, किशोर ढोके परभणी, स्नेहलता झरकर अंदुरे उस्मानाबाद, प्रा.विद्या देशमुख उस्मानाबाद,जयश्री घोडके मॅडम नळदुर्ग,पत्रकार अभिमान हंगरकर, पत्रकार उमाजी अप्पा गायकवाड, उपसरपंच सुजित हंगरकर,पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, बालकवी बाबा जाधव कोल्हापुर, कवी विलास पाटील सरकार हातकंणगले कोल्हापुर, पोपट माळी नोंदणी अधिकारी सोलापुर, चंदु नाना काळे काटी, नितिन कोकीळ उस्मानाबाद हे उपस्थित होते.

*कवी संमेलनासाठी काटकर काटी कुंटुंबिया तर्फे दालचा राईस हे स्वादिष्ट, रुचकर सुरुची भोजन ठेवण्यात आले होते. केशव कासार काटकर व राजेंद्र कासार काटकर यांनी सविनय आग्रह करत मान्यवरांना जेवण देऊन तृप्त केले.*
*समुहातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.शाल, फेटा, पुष्पहार ,पुष्पुगुच्छ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देउन यथोचित सन्मान करण्यात आला. कवी संजय धोंगडे उस्मानाबाद, कवी बाळ जमाले कसबे तडवळा, मिना महामुनी,मनिषा पोतदार, अश्विनी धाट कुलकर्णी, गुणवंत चव्हाण, विजय गायकवाड उस्मानाबाद, यांचा समुहा तर्फे सत्कार करण्यात आला.*
*समुहासाठी मेहनत घेणारे सोमनाथ जामगावकर, हर्षवर्धन माळी तथा बापु काळे काटी यांचा सत्कार करण्यात आला. तालुका शिक्षक पतसंस्था तुळजापुर व्हा.चेअरमन दयानंद जवळगावकर, जिल्हा शिक्षक पतसंस्था उस्मानाबाद व्हा.चेअरमन अनिल हंगरकर यांचा पण सत्कार करण्यात आला.*
*कवी संमेलनासाठी सहभागी कवी गुणवंत चव्हाण (सोलापुर),चंदुबाई खंदारे (उस्मानाबाद),विजय गायकवाड (उस्मानाबाद),गणेश लोंढे (कासारी),विलास पाटील सरकार इंगळी(हातकंणगले),विजय कांबळे (मुंबई),बाबा जाधव (कोल्हापुर) ,अजय धर्मे (धामणगाव),संजय धोंगडे (उस्मानाबाद),पोपट माळी (सोलापुर),मधुकर हुजरे (उस्मानाबाद),बाळ जमाले (उस्मामाबाद), राजकुमार लोखंडे (परभणी),अश्विनी धाट (उस्मानाबाद),मिनाताई महामुनी (उस्मानाबाद),मनिषा पोतदार (उस्मानाबाद), प्रा.विद्या देशमुख (उस्मानाबाद),स्नेहलता झरकर अंदुरे (उस्मानाबाद),धम्मायन कांबळे (मातोळा),मल्हारी गायकवाड (मातोळा),बाळासाहेब मगर (केशेगाव),जयश्री घोडके मॅडम (नळदुर्गे), राहुल शेंडे (मोहोळ) ,किशोर ढोके (परभणी),गजानन बोणे (भोकर जि.नांदेड),प्रशांत देशमुख (धामणगाव),तर रुबिना शेख,सुशांत क्षिरसागर,संतोष क्षिरसागर,वाघमारे श्रावण (काटी ..स्थानिक कवी) हे उपस्थित होते*
संमेलन यशस्वी केल्यामुळे राजेंद्र कासार काटकर व पंकज कासार काटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, पुष्पहार, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कवी संमेलनाचे बहारदार सुत्रसंचालन कवी पंकज कासार काटकर तर आभार प्रदर्शन कवी बापु काळे यांनी केले
संमेलनात बाप, दुष्काळ, पंढरीची वारी, आईबाप, कोरोना, लाॅकडाऊन, निसर्गराजा, भोंगा, हुंडाबळी, काही गझल शेर, शायरी, सादर करत संमेलन अधिक बहारदार केले गेले.
सर्वच मान्यवरांनी पंकज कासार काटकर यांचे व काटकर कुंटुंबियाचे स्वागत,स्तुस्ती,कौतुक करत शुभेच्छा दिल्या.उपसरपंच सुजित हंगरकर यांनी आमच्या काटी गावाचे नाव आपण मोठे करत आहात.गावासाठी हे संमेलन ऐतिहासिक ठरत असुन मान्यवर कवीमूळे गावाच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली. गावाला संमेलनाची गोडी लागत आहे असे गौरोदगार काढले.
संमेलन यशस्वी व उत्साहात संपन्न झाले.