ताज्या घडामोडी

कंगना पुन्हा बरळली, अन्नदाता बळीराजाची दहशतवादी म्हणून अवहेलना

स्वराज्य न्यूज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा बरळली आहे. यावेळेस तर तिने थेट अन्नदाता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून हिणवले आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला असताना व हे आंदोलन चिघळत चालले असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याने ती चांगलीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

कंगनाने सीएए विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत कृषी विषयक विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही’, अशा प्रकारचं ट्विट कंगनाने केलं आहे.


कृषी विषयक विधेयकांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केलेला विरोध, विधयके दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पंजाब व हरयाणात भडकलेलं आंदोलन, विविध शेतकरी संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला. मात्र, हे ट्विट एम्बेड करत कंगना राणावतने मतप्रदर्शन केले असून कंगनाचं ट्विट नव्या वादाला तोंड फोडणारं ठरलं आहे.
कृषी विषयक विधेयकांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केलेला विरोध, विधयके दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पंजाब व हरयाणात भडकलेलं आंदोलन, विविध शेतकरी संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न या ट्विटच्या माध्यमातून केला. मात्र, हे ट्विट एम्बेड करत कंगना राणावतने मतप्रदर्शन केले असून कंगनाचं ट्विट नव्या वादाला तोंड फोडणारं ठरलं आहे. हे ट्वीट कंगनाला येणाऱ्या काळात नक्कीच त्रासदायक ठरणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close