पुणे

पुणे जिल्हाधिकारी यांचा आळंदी नगरपरिषदे तर्फे सत्कार


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विशेष योगदान देवून उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल राज्यात उल्लेखनीय यश पुणे जिल्ह्याने मिळवले. या बद्दल आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते डॉ.देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.


या वेळी माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,नगरसेवक माजी उपाध्यक्ष सचिन गिलबिले, गट नेते नगरसेवक तूषार घुंडरे,नगरसेविका रुख्मिणी कांबळे,आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जून मेदनकर,बाळासाहेब वीर,अशोक राजगुरू,नाना घुंडरे उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी शुभेच्छा देत आळंदीतील विविध विकास कामांसाठी संवाद साधला.आळंदीतील पद्मावती रस्त्याचे विकास कामाला गती देण्याची मागणी केली.यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुचविले. तसेच इंद्रायणी नदी वरील अर्धवट अवस्थेतील स्काय वॉकचे कामाचे ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून उर्वरित काम तात्काळ सुरू करण्याची त्यानी मागणी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close