पुणे

आळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने नेण्याची आळंदी ग्रामस्थांची मागणी भाविक, वारकरी , स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रम,आणे यावर्षीही कोरोंना महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी एआरटीएचएटी बसने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी भाविक,वारकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचे दृष्टीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कु-हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.

सन २०२० मध्ये सुरू झालेले कोरोंना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरात कोरोंनाने मोठे संकट लोकांसमोर उभे केले आहे. यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अजून पुर्णपणे कोरोंना संकट संपलेले नाही. कोरोंना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी यासाठी तसेच पालखी सोहल्यामुळे कोरोंना संकट वधू नये दक्षता म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने मोजक्याच भाविकांत साजरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोत निवडणूक,तसेच इतर ग्रामपंचायत निवडणुका तसेच

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोंना महामारी वाढली. हा अनुभव लक्षांत घेता यावर्षी पालखी सोहळा कोरोंना महामारी संकट अजुंकायम असल्याने शासनाने व्यापक लोक हितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोंना महामारी वधू नये यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा. पायी वारीचा हट्ट सुरू आहे तो सोडावा तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीच विचार करून कोरोंना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. सोहळा बसने ये-जा करताना प्रथा परंपरांचे पालन व्हावे, प्रस्थान नंतर व परत वारी हून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे करून आषाढी वारी सोहळा मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोंना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांचे वतीने ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close