ताज्या घडामोडी

माझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थात माझी वसुंधरा अभियान ऑक्टोबर २०२० ते मे २०२१ या कालावधीत राबविण्यात आले. अभियांनातर्गत स्थानिक स्वराज संस्थांनी पंचतत्वांवर म्हणजेच पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश यामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यात आले. यात तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेने ही भाग घेतला होता. या माझी वसुंधरा अभियानांत उत्तम कामगिरी झाल्याने अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ व्या स्थानावर असल्याची माहिती मुख्याधिकारी व अभियानचे प्रमुख मार्गदर्शक अंकुश जाधव यांनी दिली.

या अभियान अंतर्गत आळंदी शहरात होम कंपोस्टींग, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलरचा वापर, सांडपाणी पुर्नवापर, पाच व अधिक वृक्ष लागवड, घराच्या परिसरात लॉन, टेरेस गार्डन विकसित करणे, बॅटरी चलित वाहन , सायकलचा वापर आणि कमी वीज वापर करणारी यंत्रे वापरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. यास आळंदी शहरात नागरिकानाकडून प्रतिसाद मिळाला. यासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव , नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नागरिकांना प्रोस्ताहन दिले. या उपक्रमात शहरात दोन ठिकाणी विद्युतचलित वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात आले. शहरात इंद्रायणी नदी व परिसर स्वच्छता मोहिम, शहर स्वच्छता मोहिम, नो व्हईकल डे, ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, शहरातील सार्वजनिक ठिकाणी विविध स्वच्छतेचे संदेश देणारी बोलकी भिंत, दुतर्फा दुभाजकावर लक्षवेधी पेंटिंग यासारखे उपक्रम राबविण्यात आले. शहरातील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर कच-यापासून निर्माण होणा-या खताचा वापर करून सर्व्हे क्रमांक १९३ येथील प्रक्रिया केंद्रावर रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. शहरातील ओल्या व सुक्या कच-यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे, रोड डिव्हायडर, सिद्धबेट इ परिसरात वृक्ष लागवड यात करण्यात आली.

या कामाचे राज्य शासनाकडून मुल्यमापन करण्यात आले . यात आळंदी शहराने महाराष्ट्रात १८ वा क्रमांक पटकावून शहराची मान उंचावली आहे. पुणे जिल्ह्यात आळंदी शहराने चौथ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. यासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजयंता उमरग़ेकर यांचेसह विविध विषय समिति सभापति,उपसभापति,नगरसेवक,नगरसेविका,नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. नगरपरिषद या पुढील काळात देखील पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यास पुढाकार घेणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. अभियान यशस्वी करण्यास सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close