ताज्या घडामोडी

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा अवश्य समावेश करा

आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे, फुफ्फुस आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात हाहाकार सुरू झाला आहे. यामूळे दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा रुग्णांची संख्या जसी वाढत आहे तसे, कोरोना लसीकरणही वाढत आहे. परंतु फक्त लासिकरन करून चालणार नाही. काही घरगुती उपाय कींवा काही गोष्टी टाळल्या तर स्वतःचे रक्षण करू शकतो. कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गराजेचे आहे.

*  व्हिटॅमिन सी युक्त आहार

आंबट फळे जसे- संत्री,लिंबू, टोमॅटो,किवी,स्ट्रॉबेरी,द्राक्षे,अननस,आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात.

* हिरव्या पालेभाज्या-

.हिरव्या पालेभाज्या कच्चा,वाफवून अथवा त्यांचा रस करुन आहारात घेतल्याने यकृत व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.या भाज्यांमध्ये हरितरंगद्रव्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा यकृत व फुफ्फुसांमधील रक्त शुद्ध करण्यास मदत होते.

* लसणाचे सेवन –

लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खालले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. 


* लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन-


अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने  समृद्ध असावे जसे गाजर,टोमॅटो ,कलिंगड,पपई,बीटरूट आणि हिरव्यापालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीनॉयड अँटीऑक्सीडेंट असते. जे दमापासून बचाव करण्यात मदत करते, तसेच हे खाल्ल्याने फुफ्फुसांचा कर्करोगाचा धोका कमी होतो. 

* मनुक्याचे सेवन

दररोज भिजत घातलेले मनुकाचे सेवन केल्याने फुफ्फुस बळकट होतात आणि त्यांची रोगांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती देखील वाढते.

* तुळशीच्या पानाचे सेवन

फुफ्फुसांमध्ये कफ साचला असल्यास कफ काढण्यासाठी तुळशीचे कोरडे पान, काथ,कपूर आणि वेलची सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. आता या मध्ये नऊ पटीने साखर मिसळून दळून घ्या. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खा. या मुळे फुफ्फुसातील जमलेला कफ दूर होईल.

(टिप : स्वराज्य न्यूज वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. यातील कोणत्याही उपायाचा अवलंब डॉक्टरांच्या सल्ल्याविना करू नये)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close