पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन

पिंपरी, दि. १४ मे २०२१ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त त्यांच्या बर्ड व्हॅली, संभाजीनगर येथील पुतळ्यास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, जीवन बो-हाडे, सागर तापकीर उपस्थित होते.

तर दुसरीकडे महात्मा बसवेश्वर जयंती देखील साजरी करण्यात आली. समाज एकसंध ठेवण्यासाठी आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा विज्ञानाधारीत मानवतावादी दृष्टीकोन आजही दिशादर्शक ठरत आहे असे प्रतिपादन उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांनी केले.

          पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचे जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

          यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे, अनिल बोचरे, बसवराज चेलगिरी, सुरेश गिराम, संतोष लोचे उपस्थित होते.

उपमहापौर घुले म्हणाल्या महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेविरुध्द लढा दिला.  जातीभेद, अंधश्रध्दा यावर परखड भूमिका घेऊन समतावादी विचारांचा पुरस्कार केला.  मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी दिलेली शिकवण मानवी कल्याणासाठी परिणामकारक ठरत आहे.  

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close