आरोग्य

या घरघुती उपायांनी करा शरीरातील उष्णता कमी

उन्हाळा हा आपल्याकडे मोठया प्रमाणात उष्णता निर्माण करणारा ऋतू ठरतो. या उन्हाळ्यात कडक उन्हाच्या ज्वालांनी अक्षरशः जीव हैराण होतो. परंतु अनेकांच्या अंगात उष्णतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवु शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणे.अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत ते समजून घेऊयात.

साहेब कोरोनाचा करेक्ट कार्यक्रम करा👆🙏

 • मनुका
  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज रात्री १०० ग्राम मनुका कोमट पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासकट चावुन खाव्यात.
 • पुदिना
  शक्यतो जेवताना पुदिन्याचा वापर करावा. पुदिना ची चटणी करून देखील जेवताना त्याचा आहारात समावेश करता येईल.
 • जिरे
  जिरे अत्यंत थंड आहेत.त्यामूळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे घालावेत त्या नंतर सकाळी हे पाणी प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच वजनदेखील नियंत्रणात येते.
 • ताक
  ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.त्यामुळे दररोज दूपारी ज़ेवन झाल्यावर ताक प्यावा. मात्र रात्रीच्या वेळी ताकाचे सेवन करू नये.
 • लिंबु
  लिंबाच सरबत प्यावे. त्यामुळे शरीरातील पाणीची पातळी भरुन निघते.
 • पाणी
  भरपुर पाणी प्यावे. तसेच माठातील पाणी पिण्यावर भर द्यावा. शक्यतो फ्रीज मधिल गार पाणी पिण्याच टाळाव.
 • कोकम
  कधी कधी नाईलाजाने आपल्याला प्सायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात. आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.
 • पाणीदार फळे
  शक्यतो पाणीदार फळांचा सेवन करावा. यात कलिंगड , द्राक्षे, डाळिंब. या फळांचा सेवन करावा.
 • सब्जा
  सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावे.

(टिप : स्वराज्य न्यूज वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. यातील कोणत्याही उपायाचा अवलंब डॉक्टरांच्या सल्ल्याविना करू नये)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close