ताज्या घडामोडीपुणे

कोरोना संकटात ‘मनसे’ कार्य करणारे युवा नेतृत्व : आशिष साबळे

2020 हे वर्ष केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत वेदनादायी व भयग्रस्त ठरले. कोरोनाने केलेला कहर संपूर्ण जगाने अनुभवला. परंतु वर्षाअखेर दिलासादायक दृश्य देखील बघायला मिळाले. आता कोरोना पूर्णतः हद्दपार होतो की काय असे वाटत असताना अचानक दुसरी लाट आली. आणि पुन्हा एकदा सुरळीत चालत असलेला देश स्तब्ध झाला. महाराष्ट्र यात अग्रेसर होता व सध्या देखील तीच परिस्थती आहे.
पुण्यामध्ये अगदी मागच्या वेळी जी परिस्थती उद्भवली तीच यावेळी देखील उद्भवलेली आहे. हातावर पोट असलेल्या गरीब आणि गरजू लोकांची दोन वेळ जेवणाची भ्रांत आहे. अशा लोकांचे दुःख जाणून त्यांची उपासमार दूर करण्यासाठी बरेच लोक पुढे येत आहेत.

त्यापैकीच एक कणखर बाण्याचे, निधड्या मनाचे, धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे पुणे शहर सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे हे आहेत. यांनी मागच्या वर्षी लॉकडाउनमध्ये पोलिसांना चहा, मास्क व इतर आवश्यक बाबी पुरवल्या. मजुरांना व गरीब – गरजूंना दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था करून दिली. गरिबांना भाजी वाटपापासून ते अन्न वाटपापर्यंत अनेक कार्यक्रम राबवले. अगदी त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी अन्नदानाचे हे महायज्ञ यथास्थिती सुरू ठेवले आहे.
पुण्यातील राष्ट्रभूषण चौकात दररोज चारशे ते पाचशे गरीब व गरजू लोकांना ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांसाठी अन्नदानाचे महान कार्य करत आहेत.

साहेब तेवढा कोरोनाचा करेक्ट कार्यक्रम करा 🙏👆

सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास असंख्य लोकांची रांग या ठिकाणी लागलेली असते. जवळपास गेल्या वीस दिवसांपासून ही अन्नदानाची सेवा अविरतपणे सुरू आहे. गेल्या लॉकडाऊन मध्ये देखील सलग एक ते दीड महिना त्यांचे हे अन्नदानाचे कार्य असेच सुरू होते. शंभर लोकांपासून सुरुवात करून आज चारशे ते पाचशे लोक ही मोफत अन्नसेवा घेत आहेत. ज्यांच्या आजोबांनी (बाबासाहेब ठुबे) तीन वेळा पारनेरचे आमदारपद भूषवले.

ज्यांच्या मामांनी नगरसेवक पदापासून अनेक राजकीय पदे उपभोगली अशाप्रकारे जन्मजात राजकीय वारश्याबरोबरच समाजकारणाचा वारसा ते लीलया पेलत आहेत. असे आशिष साबळे वयाच्या सोळाव्या वर्षापासून विद्यार्थी चळवळीत राजकारणात सक्रिय असून राज साहेबांच्या सहवासात राजकारणाचे धडे घेत असतानाच समाजकारणाचे व्रत अंगिकारून लोक कल्याणाचे धडे गिरवत आहेत. राजकीय घराण्याचा वारसा पुढे नेत असताना सामाजिक जाणिवा जागरूक असलेले तरुण तडफदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. रघुनाथ येमुल गुरुजींच्या मार्गदर्शनाने व दत्तगुरु सेवा परिवाराच्या सहकार्याने हे महान कार्य अखंडपणे सुरू आहे.

स्वतः येमुल गुरुजींची संस्था दिव्यांग व अंध लोकांसाठी काम करते. आजवर चार धाम, गंगेच्या किनारी, कुंभमेळा व गिरनारला अशा बऱ्याच ठिकाणी मोफत अन्नदानाची सेवा गुरूजींनी दिलेली आहे. सध्याच्या या अन्नदानाच्या महायज्ञात साबळे यांचे दत्तगुरु सेवा परिवारातील मित्रमंडळी जसे केशव चव्हाण, नितीन काळे, आशिष शिंदे, अक्षय तनपुरे व इतरही अनेक सहकाऱ्यांमुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे. केवळ अन्नदानच नव्हे तर सोबतच विटामिन सी, विटामिन डी, मल्टी विटामिन्स A to Z टॅबलेट, लीम्सी, ईबियॉन अशा कोविड साठी आवश्यक असलेल्या औषधोपचारांचा पुरवठा देखील ते पॅकेट्सच्या स्वरुपात करत आहेत.


एका बाजूला देशभरात मृत्यूचे तांडव सुरू आहे. रक्ताचे लोक सुद्धा एकमेकांच्या मदतीला धाऊन येत नाहीत. अशा परिस्थितीत आशिष साबळे यांच्यासारखी माणसं समाजातील माणुसकी व संवेदनशीलता जिवंत ठेऊन शेकडो गरीब आणि गरजुंच्या जीवनातील उपासमार संपवण्यासाठी, त्यांना या महामारीच्या काळात दिलासा देण्यासाठी प्रचंड कष्ट घेत आहेत. ही अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. त्यांच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा व त्यांनी दाखवलेल्या औदार्याला, उदारतेला, नेतृत्वाला आणि दातृत्वाला आमचा सलाम. तुमच्या कार्याने नक्कीच या महामारीला नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठा हातभार मिळेल. आपण कोरोना विरूद्धची ही लढाई लढून जिंकूसुद्धा त्यासाठी तुम्ही घेत असलेल्या पुढाकाराबद्दल खूप खूप धन्यवाद


संकलन आणि शब्दांकन
डॉ. मिलिंद भोई (भोई फौंडेशन)
प्रा. कमलनारायण उईके

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close