ताज्या घडामोडी

आदर्श शिक्षक श्री सतीश बुबने कालवश ; शिक्षण क्षेत्रातील उमदे नेतृत्व हरपले

उस्मानाबाद येथील वाशी गावचे एक आदर्श पिटी शिक्षक आणि एक जिद्दी व्यक्तिमत्व सतीश बुबने सर आज कालवश झाले. त्यांच्या मागे त्यांची 3 मुले, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार होता. मात्र सरांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण पंचक्रोशीतून शोक व्यक्त केला जात आहे.


एक धडाडीचे अन मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या शिक्षकी पेशातून यथोचित घडविले होते. आज त्यांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांत पसरले आणि सर्वांनाच दुःखद धक्का बसला.


स्वराज्य न्यूज नेटवर्क मधील ‘स्वराज्य न्यूज -बातमी आनंदाची’ या व्हिडीओ न्यूज चॅनेल चे उपसंपादक आणि उद्योजक श्री दीपक मैंदर्गे यांचे ते गुरु होते. हॉस्टेल च्या जीवनात सुमारे साडेतीन वर्षाहून अधिक काळ बुबने सर यांनी अगदी मुलाप्रमाणे जपले, घडविले. त्यामुळे गुरुवर्यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा मोठा डोंगर जणू कोसळला आहे अशी भावना श्री मैंदर्गे यांनी व्यक्त केली.


स्वराज्य न्यूज नेटवर्क च्या वतीने श्री बुबने सर यांना भावपूर्ण आदरांजली…

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close