महाराष्ट्र माझा

खुशखबर : यंदा राज्यात दुष्काळाचे सावट नाही ; राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा

उन्हाळा आला की सोबत दुष्काळ घेऊन येतो. हे समीकरण राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. खासकरून महाराष्ट्रातील विशिष्ट भागात दरवर्षी दुष्काळाची छाया असते.धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालवल्याने अक्षरशः लोक स्थलांतर करतात. मात्र यंदा याबाबत चांगली दिलासादायी बातमी आहे.

नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये 7 टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणं तळाला लागलेली असतात आणि या भागात पाणीटंचाईचं संकट उभं राहतं. पण, यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणं निम्मे भरलेली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची आता माहाराष्ट्राच्या जनतेला चिंता नाही.

  • अमरावती-51.82 टक्के
  • नागपूर -52 टक्के
  • औरंगाबाद- 58.35 टक्के
  • कोकण -51.35 टक्के
  • नाशिक- 48.29 टक्के
  • पुणे- 39.12 टक्के
  • एकूण उपलब्ध पाणीसाठा= 47.72 टक्के

राज्यातील दुष्काळाचे केंद्र ठरलेल्या मराठवाड्याला पावसाअभावी सातत्याने तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने गोदावरीला महापूर आल्याने यंदा जायकवाडी धरण भरले होते .

गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर येणारे वर्षही दुष्काळापासून दूर असणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close