ताज्या घडामोडी

सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ ; काय आहे आजचा भाव जाणून घ्या

मुंबई : देशात दैनंदिन करोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर कमॉडिटी बाजारात त्याचे पडसाद उमटले आहेत. आज सोन्याचा भाव 300 रुपयांनी वधारला असून पुन्हा 47000 रुपयांवर गेला. चांदीमध्ये देखील आज 560 रुपयांची वाढ झाली आहे

एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात 2602 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. 31 मार्च 2021 रोजी देशात सोन्याचे दर 44 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होते. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.सोन्याचे दर गेल्या आठवड्यात साधारण 700 रुपये प्रति तोळे पेक्षा जास्त किंमतीने घसरले होते.

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे.

सलग दोन सत्रात सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 233 रुपयांच्या तेजीसह 46970 रुपयांवर आहे. त्याआधी तो 47071 रुपयांपर्यंत वाढला होता. शुक्रवारी सोने 59 रुपयांनी महागले आणि 46785 रुपयांवर बंद झाले.
आज सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 44360 रुपये आहे तर 24 कॅरेटचा भाव 45360 रुपये आहे. त्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close