ताज्या घडामोडीमहाराष्ट्र माझा

ऑनलाईन शाळेलाही उन्हाळी सुट्टी जाहीर ; शिक्षण संचालकांचे आदेश

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे वर्षभर न भरलेल्या (ऑनलाईन असणाऱ्या ) शाळांसाठी औपचारिक सुट्टी आज जाहीर करण्यात आली. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १३ जून तर विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेले वर्षभर शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मध्यंतरी काही माध्यमिक शाळा ऑफलाइन सुरू करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने केले होते, पण नंतर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑफलाइन वर्ग पुन्हा बंद झाले होते.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले होते. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने वर्षभरात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. मात्र आता परीक्षा रद्द करण्यात आल्याने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती.

शाळांना दीर्घ सुट्टी जाहीर करण्याचा स्वतंत्र अधिकार नाही. सलग ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही होण्याची शक्यता आहे. सुट्टीचा निर्णयामुळे राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात एकसूत्रता राहील हे लक्षात घेऊन सरकारने उन्हाळी सुट्टी संदर्भात निर्णय जाहीर करावा या शिक्षकांच्या मागणीला आज यश आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close