पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

पिंपरी, ३० एप्रिल २०२१ :- गरीबीतही आनंदी जीवन जगण्याच्या मूलमंत्राची ग्रामगीतेच्या माध्यमातून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.  ब्रिटीशांच्या अन्यायाविरुध्द आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले होते.   तुकडोजी महाराज हे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होते.  अज्ञान, अंधश्रध्दा निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.  त्यांची “ राजास जी महाली सौख्ये न प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ”  ही कविता अत्यंत गाजलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close