ताज्या घडामोडीपुणे

जिल्हाधिका-यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ मेसेज खोटा



पुणे, दि. 22 : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुण्यासह पुणे विभागातील काही जिल्हयात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जिवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. अशी कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आला नाही.

हा संदेश खोटा असून अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये असे आवाहन प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी केले आहे. अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close