पिंपरी चिंचवड

रामनवमी निमित्त चिंचवड येथील अनाथ आश्रम मधे फळ वाटप ;रविदादा भिलारे सोशल फाउंडेशनचा उपक्रम


थेरगाव : एकीकडे कोरोनाचे संकट गहरे होत असताना, अनेक अनाथ व गरीब मुलांची खाणे पिण्याची परवड होत होती. तसेच तीव्र कडक उन्हाळा असल्याकारणाने मुलांना आपल्या बालपणीच एक आठवण म्हणून जे आंबे खायला मिळायचे ते दरम्यानच्या काळात कोरोना मुळे मिळत नव्हते, म्हणून तेच आपुलकी चे एक नात म्हणून थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रविदादा भिलारे सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत गरजू व अनाथाश्रमातील मुलांना रत्नागिरी हापूस या आंब्याचे तसेच फळांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.

या गोरगरीब मुलांच्या बालपणीच्या आठवणींना कुठे ही खंड येऊ नये म्हणून हे आपण केल्याचे रवी भिलारे यांनी सांगितलं. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close