संस्कृती

म्हणून श्रीरामांचे नाव नाव रामचंद्र असे पडले… वाचा अख्यायिका

आज रामनवमी.या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला. म्हणून देशभरात हा दिवस श्री रामनवमी म्हणून उत्साहात साजरा केला जातो.

रामजन्माच्या अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. ज्यात प्रभू श्रीरामांचे नाव रामचंद्र कसे पडले याबाबत काही अख्यायिका पुढीलप्रमाणे सांगितल्या जातात.

चैत्र महिन्यातील नवमी. प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले. ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले. सूर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले. इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सूर्यानारायणाचे समाधान होईना.

त्या वेळी सूर्यभगवान आपल्या जागेवरून हालेनात. इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या.

पण “चंद्रदेव” मात्र दु:खी होते. सूर्यदेव पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना.त्यामुळे चंद्रादेवांनादर्शन घेता येईना.त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना.

शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले की सूर्याला पुढे सरकायला सांगा पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात. माझे समाधान झाले की मी पुढे जाईन, असे म्हणू लागले.
रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , “राम – चंद्र” आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल.
राम जन्म दुपारी झाला.आणि पुढल्या अवतारात “श्री कृष्ण ” जन्म मध्यरात्री झाला.
कृष्ण जन्म झाला तेंव्हा फक्त तिघे जागे होते देवकी,वसुदेव आणि चंद्र.

दुसऱ्या पौराणिक कथेत श्रीरामांचा चंद्र मागण्याचा हट्ट कौसल्यामातेने आरसा दाखवून  पूर्ण केला होता. प्रभू रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्यांना रामचंद्र हे नाव पडले असावे असेही सांगितले जाते.

या पृथ्वीवर प्रभू रामासारखा राजा झाला नाही आणि होणार नाही. श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्याबद्दल इतके प्रसिद्ध होते कि, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना ‘ रामः शास्त्रामृतामहम् ‘ अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे.

🙏🏻 *स्वराज्य न्यूज तर्फे श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏

🙏 *जय श्रीराम…* 🙏

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close