ताज्या घडामोडीभारत

खुशखबर: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच मिळणार लस ; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मे पासून सुरु करण्यात येणार आहे. या टप्प्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने आज हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तरुणाईला देखील ही लस मिळावी असा सूर सर्वत्र उमटत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान मोदी यांना तशी विनंती देखील केली होती.अखेर आज हा महत्वाचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठखीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close