ताज्या घडामोडीहटके

कोरोनाचा आणखी एक तोटा 😃 नवरा बायकोत भांडणे वाढली, समूपदेशकांकडे तक्रारी

पुणे : कोरोनाने यंदाही मान वर काढली आहे. यात लॉकडाऊन चे निर्बंध सुरु झाल्याने पुन्हा एकदा लोकांना दिवसभर घराबाहेर पडता येत नाही. अशातच एका समुपदेशकांनी दिलेल्या माहितीनूसार लॉकडाऊनच्या या काळात कौटुंबिक कलहांचे प्रमाण वाढले आहे. लोक फोन करून तक्रारी मांडत आहेत. त्यामुळे जरी हास्यास्पद असलं तरी हे वास्तव दुर्लक्ष करता येणार नाही.

कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने याच काळात सुशिक्षित तरुणांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्तमान सोडून भविष्यातील रोजगाराची चिंता आता घराघरांत सतावत आहे.त्यातून घरात वादविवाद होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त झाल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने चिडचिड वाढली आहे. एवढेच नव्हे तर नात्यांमधील गोडवा हरवत चालला आहे.

त्यातही नवरा आणि बायको यांच्यातील कुरकुरी अधिकच वाढत चालल्या आहेत. अतिसहवासात अवज्ञा या उक्तीप्रमाणे दोन व्यक्तींचा अपेक्षेपेक्षा सहवास वाढला तर त्यांच्यात खटके उडतात. कधी एकमेकांच्या सवयी खटकतात तर कधी स्वभावातील दोष अधिक दिसतात.मग घरातील पालक, मुले असो वा पती-पत्नी, कोणतंही नातं याला अपवाद नाही.

त्यावरून व्हाट्सअप वर एक जोक आला होता की, जर नवरा आणि मुलं २४ तास घरीच राहणार असतील तर घरातल्या बायका शास्त्रज्ञांना बाजूला करून स्वतःच कोरोनावर लस शोधतील. यातला विनोदाचा भाग सोडला तर एकंदरित एका संकटातून निर्माण झालेलं हे दुसरं संकट नात्यांबाबत विचार करायला भाग पाडतं.

यापासून अशी मिळवा मुक्तता

  • एकमेकांच्या कामात जास्त लक्ष घालू नका.
  • कामांची विभागणी करा, हसतखेळत कामे पार पाडा
  • भांडण होत असलं तरी समोरच्याची बाजू समजून घेण्याचाही प्रयत्न करा.
  • मीच काय तो बरोबर, समोरच्याला काही कळत नाही, हा अॅ‌टिट्यूड बिलकूल नको.
  • कधीकधी चूक नसली, तरी झाल्या प्रकारावरून दिलगिरी व्यक्त करण्यानंही परिस्थिती सुधारू शकते. यातून तुमचा मोठेपणाच दिसतो.
  • भांडण मिटवून पुढं जायचं असेल, तर दोघांनीही आपापल्या बाजूनं तडजोड करणं आवश्यक आहे. अडून राहिल्यानं काहीच साध्य होणार नाही.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close