पिंपरी व‌ चिंचवड विधानसभेत मतदारांपर्यंत पोहोचली ‘मशाल’

पिंपरी, (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला जात आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक, सोसायट्यांमध्ये जाऊन मशाल‌ चिन्ह पोहोचवले जात संजोग वाघेरेंना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.


मतदार संघातील गेल्या दहा वर्षातील नागरिकांच्या आरोग्य सुविधा, रोजगार, शिक्षण, वाढती महागाई, बेरोजगारी, समाजातील शांतता, कायदासुव्यवस्था या प्रश्नांवर मतदारांशी चर्चा केली जात आहे.‌ या सोबत मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि आपल्यासोबत राहणारा तुमचा प्रतिनिधी म्हणून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटिका अनिताताई तुतारे, मयूर जाधव यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून मावळ लोकसभा मतदारसंघ लढवत आहेत. त्यांचे चिन्ह “मशाल” मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. तसेच सर्वसामान्य, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांचे ध्येय आहे, असे सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांमध्ये प्रचार करीत आहेत. सोसायट्यांमध्ये जाऊन भेटीगाठी व संवाद‌ साधला जात आहे. पिंपरी व चिंचवड विधानसभेतील सर्वच भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

*ही लोकसभेची निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती – योगेश बाबर*

लोकसभेची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे ब्रीद घेवून सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या “मशाल” चिन्हावर शिक्कामोर्तब करून मावळचे शिलेदार लोकसभेत पाठविण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर यांनी या वेळी केले. पदाधिकारी आणि कार्यकर्ते “फेस टू फेस” मतदारांना भेटून शहरातील सोसायटीमध्ये प्रचार करीत असून रोजगार, शिक्षणाला बळ, कष्टकरी, मजूर, भूमिहीन शेतकरी, कामगार अशा विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे नक्कीच प्रयत्नशील असतील, असेही प्रचार प्रमुख बाबर म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!