हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रम

पुणे :

          छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तसमी’१६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.या घटनेला एकुणात भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही.२०२४हे वर्ष ‘हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिना’चे ३७९वे वर्ष आहे. यावर्षी देखील सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी, ता. भोर, जि. पुणे येथे केले आहे.

          सदर दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था – रायरेश्वर, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत – रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.चैत्र शु. सप्तमी तिथीनुसार ह्या वर्षी सोमवार दिनांक१५ एप्रिल २०२४ ला हिंदवी स्वराज्य शपथ भूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स. ६ ते दु. १.३० वा. पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे जसे किशंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, ह.भ.प. श्री. राहुल महाराज पार्ठे यांचे विध्यार्थी मिरवणूक, बांबू स्वराज्य मोहीमेचे व बोधचिन्हाचे अनावरण, औषधी वनस्पतींचे वाटप, रोपण आणि मार्गदर्शन, श्री. गणेश मानकर लिखित‘गाव तिथे रुद्राक्ष वृक्ष’ पुस्तिकेचे प्रकाशन, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान, श्री. संदीप खाटपेयांचे शिव-व्याख्यान अश्या अनेक उपक्रमांची पर्वणी असणार आहे. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायां सोबत त्या काळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी,संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!