मुलगी म्हणून जन्माला आल्याचा सार्थ अभिमान – अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते विवीध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि. १७ मार्च:-मुलगी म्हणून जन्माला आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत अभिनेत्री गायकवाड यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील ६० महिलांचा सन्मान सायन्स पार्क येथे करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी अभिनेत्री प्राजक्ता म्हणाल्या की, आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ज्या महिला या जगाशी लढत असतात त्यांचा सन्मान होत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. महाराणी येसूबाई पात्रासाठी जे प्रेम जनतेतून मिळालं त्यांची जन्मभर ऋणी राहील. कमी वयात भूमिका साकारयाला मिळाली याचे अनेक ठिकाणी कौतुक होत. सुरुवातीला अभिनय क्षेत्रात मी खूप कष्ट घेतले आहेत. कुत्र्या मांजरांना घाबरत होते पण घोडा चालवायला या पात्राने शिकवले. पुरस्कार भेटणे ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात शिखर गाठायचा आहे याची जाणीव पुरस्कार करून देत असतो. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे. जीवनात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. कारण विविध क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करू शकतो. प्रत्येक क्षेत्रात महिला आज अग्रेसर आहेत. मुलगी म्हणून जन्माला आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत प्राजक्ता गायकवाड यांनी व्यक्त केले.

  अभिनेत्री सायली गोडबोले यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती व्याख्यान सादर केले.तसेच अध्यक्ष अनिल वडघुले म्हणाले की, महिलावर अन्या अत्याचार वाढले आहेत. तर काही महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही केला आहे.

कवी अनिल दीक्षित यांनी नोटाबंदी वर कविता सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवले. कवितेतून महिलांनी लपवून ठेवलेला पैसा अडचणीत कामी पडतो याचीही जाणीव करून दिली. तसेच विनोद शिंदे ,गजानन परब ,आनंद रांजणे या कवींनी आई, महिला व पत्नी यावर कविता सादर करून उपस्थित महिलांना भाऊक केले.

  यावेळी विविध क्षेत्रातील लघुउद्योग चालू केलेल्या महिला बचत गट, प्रशासकीय अधिकारी,शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रिडा आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर ,पुणे महानगरपालिकेच्या उपयुक्त प्रतिभा पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे , वन विभाग अधिकारी ऋतुजा भोरडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील नॅशनल कबड्डी चॅम्पियन मनीषा राठोड तसेच शहरातील महिला पत्रकार, महिला पोलिस आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.

   याप्रसंगी विभागीय सचिव गणेश मोकाशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, परिषदेचे प्रतिनीधी एम जी शेलार, हवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश निकाळजे,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, जिल्हा प्रतिनीधी श्रावणी कामत,चिराग फुलसुंदर, विनय सोनवणे, अशोक कोकणे, रामकुमार शेडगे, महावीर जाधव, संतोष गोतावळे, सिद्धांत चौधरी, राकेश पगारे मारुती बानेवार आदींसह पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक अपर्णा शिंदे यांनी केले तर आभार पत्रकार सुरज साळवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!