साताऱ्यात उदयनराजे भोसले समर्थक आक्रमक, उमेदवारी घोषित न केल्याने नाराजी

सातारा : भाजपने लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपकडून 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अगदी रक्षा खडसे, पंकजा मुंडे, हीना गावित, स्मिता वाघ, नितीन गडकरी यांची नावे या यादीत आहेत. परंतु उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे साताऱ्यातील उदयनराजे समर्थकांनी शिवतीर्थावर जमून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

साताऱ्याच्या पोवई नाका येथील शिवतीर्थावर मराठा समाज एकवटला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाने घोषणा दिल्या. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. उमेदवारी मिळत नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!