या तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार

सर्वांना उत्सुकता लागलेली आयपीएलचा 17 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाची आयपीएल लोकसभा निवडणुकांमुळे दोन विभागात होणार असल्याचं देखील स्पष्ट झालंय. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत खुलासा केलाय. 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेते गुजरात टायटन्स यांच्यात सलामीला सामना होण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिलीये.

देशातील लोकसभा निवडणूक आणि आयपीएल 2024 हंगाम एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हंगाम नेहमीप्रमाणे भारताबाहेर हलवण्यात येईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, बीसीसीआय आयपीएल हंगाम भारतातच दोन विभागणीत घेणार असल्याचं समोर आलं आहे. आम्ही याबाबत भारत सरकार आणि क्रिडासह विविध खात्यांसोबत काम करत आहोत. आमचा प्रयत्न हा आयपीएल भारतातच खेळवण्याचा आहे, असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!