अभिष्टचिंतन सोहळा : श्री गोविंद तुकाराम कासार

सोलापूर :

वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील श्री. गोविंद (अण्णा) तुकाराम कासार (वैराग बृहनविकास सेवा सहकारी सोसायटी लि. वैराग चेअरमन ) यांचा ८५ वा वाढदिवस नुकताच वैराग येथील कल्लाप्पा नकाते मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.


श्री. गोविंद कासार हे वैराग येथील सुप्रसिद्ध व्यापारी आहेत.त्यांचे भांड्याचे दुकान, हार्डवेअर, मोबाईल शॉपी, लग्नाचा बस्ता दुकान असे विविध उद्योग असून त्यांनी त्यात उत्तम यश संपादन केलं आहे.

त्यांचे कुटुंब हे पंचक्रोशीतील एक मोठे कुटुंब म्हणून परिचित आहे. त्यांचे दोन भावांचे मिळून २५ जणांचे एकत्रित कुटुंब आहे.
श्री. गोविंद तुकाराम कासार यांची धर्म पत्नी सौ. कुसुम गोविंद कासार त्यांचे पुत्र श्री. किरण गोविंद कासार,सून सौ. स्नेहल किरण कासार,पुत्र श्री. प्रकाश गोविंद कासार, सून सौ. सुचिता प्रकाश कासार तसेच त्यांचे बंधू स्वर्गीय मोहन कासार यांची धर्मपत्नी श्रीमती विजया मोहन कासार, त्यांचे पुत्र श्री. प्रशांत मोहन कासार, सून सौ. प्रगती प्रशांत कासार, पुत्र श्री. संदीप मोहन कासार, सून सौ. वंदना संदीप कासार, पुत्र श्री. अमोल मोहन कासार, सून सौ. मीनाक्षी अमोल कासार असा परिवार आहे. या परिवारात लुडबुड करणाऱ्या नातवंडांचा ही समावेश असून कु. ऋतुजा, श्रुती, प्रतीक, देवराज, चेतना, सुरभी, अभिनव, अबोली, पियूश, आस्था, असा त्यांचा परिवार आहे.

या सर्वांनी मोठया आनंदाने एकत्र येत श्री. गोविंद तुकाराम कासार यांचा ८५ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.
त्या कार्यक्रमास सोलापूर येथील आई प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे ज्येष्ठ नेते श्री. मोहनराव शामसुंदर डांगरे यांनी कुटुंबासह हजेरी लावत श्री. गोविंद तुकाराम कासार यांचा पुष्गुगुच्छ तसेच शाल देऊन सत्कार केला. तसेच त्यांचे जावई श्री. गुलचंद दगडोबा व्यवहारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तुळजापूर यांनी कुटुंबासह त्यांनी श्री. गोविंद तुकाराम कासार यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या कन्या सौ. चारुशीला दिलीपराव कासार, सौ. नीता अजितराव भस्मे, सौ. लता विजयराव गरगडे, सौ. संगीता दिपकराव मैंदर्गे, सौ. वैशाली गुलचंद व्यवहारे, सौ. सविता कुमारशेठ सातपुते, सौ. योगिता प्रसादशेठ डांगरे, सौ. अनिता राजेशराव कानडे तसेच त्यांच्या बहिणी सौ. प्रमिला सूर्यकांतराव मैंदर्गे, सौ. मई अण्णाराव काटकर, सौ. विजया दिलीपराव वजरिंनकर आणि सौ. ताई रावसाहेब गडदे तसेच त्यांचे होणारे नात जावई कुमार अक्षय हुलजुते (बीड) यांची उपस्थिती होती.

कुटुंबीय आणि नातलगासह त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण वैराग गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी त्यांची साखरतुला देखील करण्यात आली.

श्री. गोविंद तुकाराम कासार यांना श्री दीपक मैंदर्गे उपसंपादक स्वराज्य न्यूज तसेच संपूर्ण स्वराज्य न्यूज मीडिया परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!