महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुक्तांकडून महामानवास अभिवादन

पिंपरी, दि. ६ डिसेंबर २०२३ :- देशात एकता, समता, बंधुता नांदावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारताचे संविधान निर्माण केले. त्यामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगतो आहे. संविधानातील घटनात्मक मुल्यांचे जतन करून प्रत्येकाने भारतीय संविधानाचा अंगिकार केल्यास तेच खरे महामानवास अभिवादन असेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
भारतीय संविधानामुळे देश विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. भारतीय संविधानाच्या तत्वांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून घटनेमध्ये असलेल्या कर्तव्यांचे पालन करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय संविधानाप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी पार पाडावी लागते त्यामुळे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या कार्यकारी मंडळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कायदेमंडळ, न्यायपालिका यादेखील लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत, असेही आयुक्त सिंह म्हणाले.


भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या  पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
यावेळी माजी नगरसदस्य मारूती भापकर,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुंभार, युवराज दाखले, देवेंद्र तायडे, विशाल जाधव, संतोष शिंदे, मारूती जाकळे, विनोद गायकवाड, गुलाब पन पाटील, बि. टी. शिंदे, अजय शेख, तुकाराम गायकवाड, गणेश भोसले, प्रल्हाद कांबळे, विभागातील वसिम कुरेशी, देवेंद्र मोरे, बाळू ओझरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी परिसरातील तसेच दापोडी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांस विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र पासलकर, रमेश जाधव, मारूती बोरावके, मारूती लोखंडे, विजय पाटील, संजय देशमुख, मिलिंद जाधव, तात्याबा माने, रवि जाधव, प्रीतम कांबळे, मनोज वाघमारे, ज्ञानेश्वरी शिंदे, रेणुका जाधव, तन्वी आहेर, नीलम भवारी, रितिका जाधव, संभाजी टरले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!