पांडुरंगरायांचे पालखीचे वडमुखवाडीत स्वागत

आळंदी: वडमुखवाडी येथील मोझे हायस्कुल मध्ये पंढरपूर- आळंदी पायी वारी अंतर्गत आळंदी कार्तिकी यात्रेस जाताना श्री पांडुरंगरायांचे पादुका पालखीचे आगमन हरिनाम गजरात झाले.


यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी श्रींचे पादुकांचे दर्शन घेत श्रीनां हार, श्रीफळ अर्पण करून स्वागत केले.

यावेळी पालखी सोहळा प्रमुख अधिपती विठ्ठलराव वास्कर महाराज, पुजारी संदीप कुलकर्णी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अलकाताई पाटील, ज्ञानेश्वर मोझे, प्राचार्य राजकुमार गायकवाड, ॲड मयूर तापकीर, शिवाजी तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी आळंदीत सुरु होत असल्याने या निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती यांचे नियंत्रणात श्री पांडुरंगराय पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आळंदी कडे जाताना श्रींचे पालखीचे थोरल्या पादुका मंदिरा समोर आगमन व स्वागत झाले. यावेळी दिंडीतील वारकरी यांनी श्रींची आरती घेऊन श्रींचा पालखी सोहळा आळंदी कडे हरिनाम गजरात मार्गस्त केला. यावेळी श्रींचे दर्शन घेण्यास भाविकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!