आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम

रुपीनगर तळवडे येथे भोसरी विधानसभेचे माननीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शितलताई धनंजय वर्णेकर यांनी केले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये शितलताई वर्णेकर यांचे मोठे योगदान या भागांमध्ये आहे. महिला व जेष्ठ यांच्याकरता वेगवेगळे उपक्रम नियमित राबवले जातात सन्मान स्त्री शक्तीचा वाढदिवस दादांचा या संकल्पनेतून माझ्यासाठी खास खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर येथे काल पार पडला क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत या खेळास महिलांनी खूप उत्कृष्ट प्रसाद दिला या कार्यक्रमांमध्ये तरुणी बरोबरच महिला व ज्येष्ठ महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. सुरुवातीस छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्स्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात पार पडला या कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस सौ.कोमल प्रमोद जाधव यांना सोन्याची नथ व मानाची पैठणी व्दितीय क्रमांकाचे बक्षीस सौ.सान्वी विक्रांत पवार यांना फ्रिज व मानाची पैठणी तर तृतीय क्रमांकांचे बक्षीस सौ.काजल सुधीर दिघे यांना टीव्ही तसेच महिलांना लकी ड्रॉ मधुन पैठणी मिळाल्या. आलेल्या सर्व महिलांना एक वेगळा आकर्षक बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी
मा.नगरसेवक एस के.बाप्पू भालेकर, ज्ञानदीप विद्यालयाचे अध्यक्ष संपत भालेकर, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे,स्वामी भक्त काळे महाराज,ह.भ.प आव्हाड महाराज,श्री रमेश भालेकर, श्री सूर्यकांत भसे सर, श्री मंगेश नेरकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पतंगे गुरुजी,भाऊसाहेब काळोखे, किरण पाटील, रामदास कुटे,अनिल शेठ भालेकर, सोमनाथ नेमाने,नंदू तात्या भालेकर,शरद भालेकर,विलास तात्या भालेकर, शिरीष उतेकर,रवी शेतसंधी, किरण नखाते,दादा सातपुते,दिपक बोर्डे,के.डी.वाघमारे, पाटोळे मामा,नूर शेख,स्वप्नील वाघमारे,कमलेश भालेकर,असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून माझ्या या बहिणीचे या भागात खूप काम चालू आहे आणि यांना आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो असे उदगार माननीय कार्तिक लांडगे यांनी काढले. महिलांचा सहभाग लक्षणीय होता यामध्ये माननीय सौ. अस्मिता ताई भालेकर,सौ.शितल पारखी, सौ.वैशाली भालेकर,सौ कासार, सोबत अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!