पुण्यनगरीतील सामाजिक व अध्यात्मिक पालखी वाहणारा अवलिया : सुनीलभाऊ रासने

पुणे/झीरो ग्राऊंड रीपोर्ट.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट च्या गणेश उत्सव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे यावर्षी अयोध्या येथील श्री.राम मंदिराची प्रतिकृती साकारली होती याचे संपूर्ण आयोजन,नियोजन हे साधारण तीन महीने अगोदरच सुरू होते ते अनंत चतुर्दशी चे दिवशी, ऐतिहासिक मिरवणूकीने गणेश उत्सवाची सांगता होते.अशा जगप्रसिद्ध असलेल्या गणेश उत्सवाचे नियोजनात सतत तीन महिने पायाला भिंगरी बांधल्यागत राबणारे सुनिलभाऊ! परत लगेच येणाऱ्या नवरात्र उत्सवातही नव्या जोमाने कसे कार्यरत होतात ते एक न उलगडणारे कोडेच आहे.

नवरात्रात देखील पुणे व पिंपरी चिंचवड परीसरातील विविध ठीकाणच्या नवरात्र मंडळ व देवीच्या मंदिरास “दर्शन भेट” देणे सुरूच होते. सुनिलभाऊंनी पिंपरी चिंचवडचा महेश कोळपकर व पुण्याचा शुभम नळे या सहकारी मित्रांना सोबत घेत,
कालीका माता मंदिर बुधवार पेठ, त्वष्टा कासार देवी मंदिर ट्रस्ट, चतुःशृंगी मंदिर, नवी सांगवी येथील महालक्ष्मी मंदिर, भवानीमाता मंदिर भवानी पेठ,आई कालीका मंदिर मालधक्का चौक, महालक्ष्मी मंदिर सारसबाग, तुळजा भवानी माता मंदिर मोहन नगर, पिंपरी चिंचवड, स्वामी प्रतिष्ठान प्राधिकरण, तुळजा भवानी माता मंदिर आकुर्डी अशा विविध देवी मंदिर व नवरात्र उत्सव मंडळास अशा विविध मंदिरास सतत दहा दिवस दर्शनभेट घेतली,
कोठून येते ही उर्जा? कसे करतात हे नियोजन कारण वेळ,वय, प्रपंच व्यवसाय या सर्व गोष्टींचे नियोजन करून नंतर सामाजिक व अध्यात्मिक कार्य करावयाचे असते.
बर हे सर्व करीत असतांना कुठेही सोशल मिडीया,टी.व्ही. चॅनल कींवा वर्तमान पत्रात प्रसिद्धी नाही. वरील तिन्ही बाबी ते मॅनेज करू शकतात पण नाही कारण ती विचार धाराच नाही केवळ अंतरआत्म्याने आवाज दिल्याने प्रामाणिक पणे काम करणे हाच त्यांचा पिंड आहे मग ते कार्य सामाजिक असो की अध्यात्मिक!

सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट चे माध्यमातून विविध मेडिकल कँप घेणे.जेष्ठांना विविध सवलती देणे, डोळे तपासणी,मोफत चष्मे वाटप, रूग्ण सेवे बरोबरच मोठे शैक्षणिक कार्यही सुनिलभाऊ सातत्याने करीत असतात.
या बरोबरच समाज पातळीवर म्हणाल तर “पहिला दोन दिवसीय” वधूवर मेळाव्याची कल्पना मांडून ती पूर्णत्वास नेणारे सुनिलभाऊ रासने हे पहिले सामाजिक नेतृत्व थोडक्यात “दोन दिवसीय वधूवर मेळाव्याचे जनक” म्हटले तर वावगे ठरू नये.


त्याच प्रमाणे कासार सोशल ग्रुप पुणे चे मार्फत विद्यार्थ्यांना दरवर्षी लाखो रूपयांची शिष्यवृती वाटप, विद्यार्थ्यांना विविध काॅलेजला ॲडमिशन मिळवून देणे, समाजातील “मिशन प्रशासन” या शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेस विविध प्रकारची मदत करणे तसेच “मिशन प्रशासन” सोबत “करीयर मार्गदर्शन शिबीर” आयोजित करणे असे सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत असतात.
सामाजिक क्षेत्रा बरोबरच अध्यात्मिक नेतृत्व कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच पुण्याचे सुनिलभाऊ रासने असे म्हटले तर वावगे होणार नाही.
यामुळेच गणपती बाप्पा व आई कालीका माता सुनिलभाऊंना उर्जा देत असतील हे निश्चित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!