चाकण येथे संत सावतामाळी चौकाचे अनावरण

 

चाकण पुणे नाशिक हायवे लगत तसेच आंबेठाण-वरळे कडे जाणाऱ्या चाकण येथील प्रमुख चौकाचे नामकरण संत सावता माळी चौक असे चाकण येथील माळी समाजाच्या वतिने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुनश्च एकदा करण्यात आले. यावेळी नविन डिजिटल बोर्ड बसवण्यात आला. माजी ग्रामपंचायत सदस्य कै गणपत नाना शेवकरी यांनी या चौकाचा ठराव त्यांच्या कार्यकाळात सर्वानुमते केला होता. तसेच संबंधित शासकीय अधिकारी व कार्यालयात रितसर पत्रव्यवहार व परवानगी संत सावता माळी समाजातील कार्यकर्ते यांच्या वतीने घेण्यात आली. यासाठी शिवसेना नेते शेखर नाना पिंगळे, मा ग्रा पं सदस्य रंगनाथ गोरे, उद्योजक रोहन कांडगे, प्रमोद टिळेकर व स्वामी कानपिळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी नगराध्यक्ष मंगल ताई गोरे, शोभा शेवकरी, पत्रकार अविनाश दुधवडे, मा नगरसेवक प्रवीण गोरे, मा उप सरपंच अशोक बिरदवडे, आय काँग्रेसचे मचिंद्रनाथ गोरे, चा ग्रा बि स पतसंस्था चेअरमन सुनील नायकवाडी, चा ग्रा बि स पतसंस्था व्हाईस चेअरमन निलेश टिळेकर, चा वि का सो संचालक गोरक्षनाथ कांडगे, चा वि का सो संचालक राजेंद्र खेडकर, चा वि का सो संचालक दत्तात्रय गोरे, चा ग्रा बि स प संचालक सुरेश कांडगे, चा ग्रा बि स पतसंस्था संचालक प्रकाश भुजबळ, चा ग्रा बि स पतसंस्था संचालक नवनाथ शेवकरी, उद्योजक अनिकेत शेवकरी सुनील शेवकरी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी माऊली शेवकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!