रामती व्यापारी महासंघाच्या संचालक पदी शाम तिवाटणे यांची निवड

बारामती : राजकीय चाणक्यांची पंढरी, शैक्षणिक नगरी तसेच उद्योग नगरी म्हणून अवघ्या देशात प्रख्यात असलेल्या बारामतीच्या व्यापारी महासंघाच्या संचालक पदावर कासार समाज गौरव व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रसिद्ध नेतृत्व मा.शामदादा तिवाटणे यांची निवड झाली आहे. त्यांच्या संचालक पदी झालेल्या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटना, व्यापारी, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शामदादांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किराणा, कापड, स्टेशनरी, मेडिकल, ज्वेलर्स, इतकेच काय पण बारामती शहरात पानटपरी पासून ते मोठ्या उद्योगापर्यंत प्रत्येक उद्योगात कार्यरत व्यापाऱ्यांची स्वतंत्र संघटना आणि या सर्व संघटनांचा व्यापारी महासंघ मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विविध व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, सचिव या महासंघाचे सदस्य असतात व यामधून या महासंघाच्या संचालक पदावर निवड होत असते. सदरची निवड अतिशय प्रतिष्ठेची व जबाबदारीची मानली जाते. मागील अनेक वर्षांपासून सदर महासंघ नफ्यात कार्यरत असून शिल्लक भागभांडवल मधून विविध व्यापाऱ्यांना पोषक असे व सामाजिक उपक्रम राबविले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!