छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणि जगदंबा तलवार स्वराज्यभूमीत आणणार… काय आहे याचा इतिहास जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची जगदंबा तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. ही तलवार लंडनमध्ये आहे. ही तलवार २०२४ च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीची चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार ही इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयातील रॉयल कलेक्शनमध्ये ठेवण्यात आल्याचे ठोस पुरावे सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले. ही माहिती सह्याद्री इतिहास संशोधन समिती केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी दिली होती. यावेळी आडसुळे यांनी ही माहिती दिली होती की चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये भारत भेटीवर आलेल्या ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्सला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार होती. इंद्रजित सावंत यांनी पुस्तकातही ही बाब मांडली आहे. मात्र कॅटलॉगमुळे ही तलवार राणी वैयक्तिक संग्रहालयात असल्याचं सिद्ध झालं.

अशी गेली तलवार लंडनला…

प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड हा १८७५ मध्ये भारत भेटीवर आला होता. या प्रिन्सला जुनी शस्त्रं गोळा करण्याची आवड होती. त्यातून त्याने भारतातल्या राजे-महाराजांकडून अनेक शस्त्रं नेली. या शस्त्रांमध्ये कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हे अवघ्या ११ वर्षांचे होते. त्यांच्याकडून ही जगदंबा तलवार जबरदस्तीचं गिफ्ट म्हणून घेऊन गेला. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली आहे.

वाघनखे

 


वाघनखं हे हाताच्या मुठीत लपवण्यासारखं मात्र प्रचंड धोकादायक शस्त्र आहे. वाघनखं वाघाच्या पंजावरील नखासारखच असून त्यांना मूठ आवळल्यावर लपवता येतात. अगदी याची पट्टी दोन अंगठ्या बोटात घातल्यासारखी दिसते. त्याला आतल्या बाजुनं तीक्ष्ण नखं लावलेली असतात. छत्रपती शिवरायांनी याच वाघनखांचा उपयोग करुन स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा वध केला होता. मात्र त्यानंतर छत्रपती शिवरायांची ही वाघनखं इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचं स्पष्ट झालं. ही वाघनखं इंग्लंडला गेली कशी, यावर मोठी चर्चा घडत आहे. मात्र मराठा साम्राज्य काळातील अनेक वस्तू इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचं स्पष्ट होत गेलं.

किमान आतातरी छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ती तलवार तात्काळ भारतात आणून हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवावा हिच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!