यादिवशी चांद्रयान 3 चंद्रावर उतरेल ; महत्वाची माहिती मिळाली

चांद्रयान 2 फेल झाल्यानंतर ISRO ने चांद्रयान ३ ची तयारी केली. पण चांद्रयान ३ हा चांद्रयान २ च्या अपयशावर आधारित होता. म्हणजेच चांद्रयान २ अपयशी का झालं. याचा विचार आणि त्याच्या Depth मध्ये जाऊन विश्लेषण केले गेले आणि या चुका टाळून चांद्रयान ३ ची योजना तयार झाली.

नुकतंच रशियानेही चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं पण ते फेल झालं. अशा वेळी संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे. हे यान जेव्हा चंद्रावर यशस्वी Land होईल तेव्हा भारत आणि ISRO ने एक इतिहास रचला असेल हे नक्की.याबाबत एक महत्वपूर्ण अशी माहिती इस्रोकडून मिळाली आहे.

ISRO ने पुन्हा एकदा चांद्रयान-3 चे आतापर्यंतची सर्वात मोठे अपडेट दिले आहे. चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याची तारीख 27 ऑगस्टपर्यंत देखील पुढे ढकलली जाऊ शकते.

अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल.

नीलेश देसाई यांनी सांगितलं की, लँडर 23 ऑगस्टला चंद्रापासून 30 किमी अंतरावरुन चंद्रावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी लँडरचा स्पीड 1.68 किमी प्रति सेकंद असेल. हा वेग खूप जास्त आहे. त्याआधी 2 तास आम्ही सर्व कमांड लँडर मॉड्युलला दिल्या जातील. सर्व काही तांत्रिक गोष्टी तपासू दोन तास आधीच आम्ही निर्णय घेऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!