नागपंचमीचा सण महत्व आणि परंपरा

आज देशभरात नागपंचमीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो. या दिवशी घरोघरी नाग प्रतिमेचे पूजन करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून साजरा केला जाणारा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पंचमी तिथी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे 5.53 ते 8.30 अशी असेल.

असे म्हटले जाते की, या दिवशी नागासोबत भगवान शिव आणि रुद्राभिषेक केल्याने; कालसर्पदोष दूर होतो; तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कारण नाग भगवान शिवशंकराच्या गळयात विराजमान आहे; आणि नाग पृथ्वीला संतुलित करतात; त्यामुळे नागपूजनाला पुराणामध्ये महत्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की; नागदेवता लक्ष्मीचे रक्षण करते. त्यामुळे धनसंपदा आणि समृद्धी मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!