कासार आय.टी. प्रोफेशनल नेटवर्किंग” – गेट टुगेदर उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :

शनिवार दि.१९/०८/२०२३ रोजी दुपारी कालिकादेवी मंदिर, पुणे येथे समाजातील ५० हून अधिक आयटी प्रोफेशनल – पुणे,नगर,नाशिक,शिर्डी अश्या महाराष्ट्रातून विविध भागातून प्रत्यक्ष सहभागी होत,मिटिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

उन्मेष मुळे व सहकाऱ्यांच्या माध्यमातून कासार समाजातील देशा-विदेशातील ४०० हून अधिक प्रोफेशनल, आय.टी. क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करत आहेत.
याचाच भाग म्हणून “पहिली नेटवर्किंग मिटिंग” आयोजित केली, या मिटिंगचे उद्घाटन योगेश सातपुते, व प्रीती नहार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मिटिंगचे उद्दिष्ट व कार्य – मनोगत – उन्मेष मुळे यांनी मांडले.

यामध्ये संतोष जुन्नरकर, योगेश सातपुते, प्रीती नहार,सुप्रिया कासार-कानिटकर, कमलेश अंधारे, पुरुषोत्तम शेटे,उन्मेष मुळे या आयटी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींनी Artificial Intelligence, Entrepreneurship, Startups, HR Perspective,Skills Development, Benefits of Networking, Opportunities in IT for Freshers, Experience,Latest Trending Technologies अश्या वेगवेगळ्या Domain वर मोलाचे मार्गदर्शन केले.

या मिटिंगमध्ये सर्वांना सहभागी करावे, बोलते करावे, म्हणून महेश जुन्नरकर यांनी खूप छान Quiz, Games चे नियोजन केले.

या मिटिंगचे सूत्रसंचालन – मंदार सासवडे यांनी केले.

अल्पोपहार व नेटवर्किंग करत सर्वांनी या मिटिंग आस्वाद घेत, अजून असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त करत, मिटिंग संपन्न झाली.

ही मिटिंग यशस्वी करण्यासाठी उन्मेष मुळे, संतोष जुन्नरकर, राहुल मांगले, महेश जुन्नरकर,योगेश तंटक, मंदार डांगरे, योगेश कुंभारकर,नितीन डांगरे, मंदार सासवडे,अनिल भांडेकर यांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!