तंत्रज्ञान

खुशखबर…आता व्हॉटस अप वरून पैसे पाठवता येणार

भारतातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता आणखी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन आर्थिक देवाण-घेवाण करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे.

मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविण्याची सुविधा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने UPIवर आधारित पेमेंट व्यवस्था बनवली आहे. या सेवेनुसार आर्थिक व्यवहारातील देवाण-घेवाण होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना घरबसल्या हातात पैसे मिळणार आहेत. याआधीही या प्रणालीची चाचणी केली होती.

भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय उपलब्ध असल्यास हे सोपे होणार आहे. जर हा पर्याय उपलब्ध नसल्यास, व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय आपण मिळवू शकतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला डेबिट कार्ड लागणार आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणार आहे. यानंतर खाली आलेल्या पर्यायापैकी बँकेची निवड करून आपली माहिती भरावी लागणार आहे.

खूप वाट पाहिल्यानंतर WhatsApp Pay चे फीचर लाइव्ह करण्यात आले आहे. म्हणजेच आता व्हॉट्सअॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करता येवू शकणार आहे. हे UPI- आधारित व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्विस आहे. याची भारतात फेब्रुवारीपासून टेस्टिंग केली जात होती. आत याला सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. याद्वारे युजर्सला आपल्या यूपीआय इनेबल बँक अकाउंट्सला लिंक करू शकता येते. व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवता येवू शकते. व्हॉट्सअॅप पे सर्व प्रसिद्ध बँक्स एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि एअरटेल पेमेंटला सपोर्ट करते.

फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांनी याविषयी सांगितले की, ‘भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचे प्रात्यक्षिक आले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवू शकणार आहेत. या सेवेबद्दल आम्ही उत्साही आहोत की, कंपनी भारतात डिजिटल पेमेंट करण्यातही योगदान देणार आहे.’

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसांची देवाण- घेवाण करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविणे मेसेज पाठवण्या इतके सोपे असणार आहे.’

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close