पुणे

पुण्यात होणार जप्त वाहनांचा लिलाव; ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ही आहे मुदत

पुणे,दि.२६: मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या २८ वाहनांचा जाहिर ई -लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी पिंपरी चिंचवड येथे दिनांक १० मार्च २०२१ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ०५ या वेळेत होणार आहे.

ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिपरी चिंचवड येथील आवारात दिनांक ०१ मार्च २०२१ ते दिनांक ०८ मार्च २०२१ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई लिलावात एकुण २८ वाहने उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी.व्हॅन, पिकअप व्हॅन, टूरिस्ट टॅक्सी, जेसीबी, एलएमव्ही कार या वाहनांचा समावेश आहे.

ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची वाहन मालकांना संधी राहील. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांच्या सूचना फलकांवर नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तींना वर नमूद केलेल्या स्थळी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता यईल. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दिनांक ०१ मार्च २०२०१ ते दिनांक ०३ मार्च २०२१ या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.

सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close