रामदेवबाबांच्या पतंजलीनिर्मित ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी; इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतला होता आक्षेप

कोरोनिल हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीने केला होता. पण त्याला डब्लूएचओ,आयएमए सारख्या संस्थांची परवानगी नसल्याचं सांगत या औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली.
भारतातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मोदी सरकारनं कोरोना लसीकरण मोहीम सुरू केलं आहे. शिवाय विविध औषधं वापरून कोरोना रुग्णांवर उपचारही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोनिल औषधाला कोरोनावरील उपचारासाठी मंजुरी दिली. पण उद्धव ठाकरे सरकारनं मात्र या औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. या औषधाच्या वापरामुळे 70 टक्के रुग्ण तीन दिवसात बरे होतील असा दावा पतंजलीनं केला होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनिल औषधाला अधिकृत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.रामदेवबाबांच्या पतंजलीनिर्मित ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी; इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतला होता आक्षेप कोरोनिल हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीने केला होता. पण त्याला डब्लूएचओ,आयएमए सारख्या संस्थांची परवानगी नसल्याचं सांगत या औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली. भारतातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मोदी सरकारनं कोरोना लसीकरण मोहीम सुरू केलं आहे. शिवाय विविध औषधं वापरून कोरोना रुग्णांवर उपचारही सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोनिल औषधाला कोरोनावरील उपचारासाठी मंजुरी दिली. पण उद्धव ठाकरे सरकारनं मात्र या औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. या औषधाच्या वापरामुळे 70 टक्के रुग्ण तीन दिवसात बरे होतील असा दावा पतंजलीनं केला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनिल औषधाला अधिकृत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.