पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी अज्ञान आणि अंधश्रध्दा निर्मुलनासाठी केलेल्या महान कार्याचा वारसा आजच्या पिढीने जोपासावा असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत गाडगेबाबा यांचे जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर केशव घोळवे,सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उल्हास जगताप, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, समाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close