मनोरंजन विश्व

बिग बॉसचा 14 वा सीझन अभिनेत्री रुबीना दिलैकनं जिंकला;मराठमोळा राहुल वैद्य उपविजेता

रिअलिटी शो बिग बॉसचा 14 वा सीझन अभिनेत्री रुबीना दिलैकनं जिंकला आहे. या विजयाबरोबरच तिला बक्षीसाची रक्कम म्हणून 36 लाख रुपयेही मिळाले आहेत.
गायक राहुल वैद्य फर्स्ट रनर अप ठरला. याआधीही इंडियन आयडॉल या गाण्याच्या रिअलिटी शोमध्येही तो उपविजेता ठरला होता.

रूबीनाव्यतिरिक्त राहुल वैद्य, राखी सावंत, निक्की तांबोळी आणि अली गोनी हे पण बिग बॉसच्या फायनलपर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे पाच फायनलिस्टपैकी राहुल, राखी आणि निक्की हे तीन फायनलिस्ट मराठी होते.

पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना 14 लाख रुपये घेऊन कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. यावर विचार करण्यासाठी स्पर्धकांना अवघा 30 सेकंदांचा वेळ दिला गेला. राखी सावंत हिने 14 लाख रुपये घेऊन शो सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कमी व्होट मिळाल्यामुळे अली गोनीही स्पर्धेतून बाहेर पडला. निक्की तांबोळीलाही नंतर बाहेर पडावं लागलं आणि शेवटी रुबीना आणि राहुलच उरले. निक्की आणि राहुल या दोन मराठी स्पर्धकांना हरवत रुबीना बिग बॉस 14 ची विजेती ठरली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close