पुणे

या गोष्टीसाठी पुणे जिल्ह्याला मिळाले देशात प्रथम क्रमांकाचे बक्षीस; जिल्हाधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

  • प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यास लाभार्थी तक्रार निवारण व भौतिक तपासणी बाबी अंतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर
  • जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन


पुणे दि. 22 : प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यास लाभार्थी भौतिक तपासणी बाबी अंतर्गत देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

याचबरोबर उत्कृष्ट काम करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यास अनुक्रमे लाभार्थी तक्रार निवारण व भौतिक तपासणी बाबी अंतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. पुणे जिल्हयाचा गौरव होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.


बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी अे पी शिंदे सभागृह, एनअेएससी कॉम्प्लेक्स , पुसा नवी दिल्ली येथे दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान संपन्न होणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close